Kharif Season: बुलडाणा जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पीकविमा भरपाईपासून वंचित असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रखडलेली पीकविमा रक्कम तातडीने वितरित करावी तसेच शेतीकामांसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली..तुपकर यांनी मुंबईतील मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी आमदार मनोज कायंदे उपस्थित होते..Crop Insurance Compensation: संगमनेर तालुक्यात पीकविमा भरपाई द्यावी : रमेश शिंगोटे .सन २०२४ आणि २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नसल्याचे तुपकर यांनी निदर्शनास आणून दिले. .Crop Insurance Compensation: धान, तूर, सोयाबीन विम्याची रक्कम खात्यात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून संबंधित विमा कंपन्यांना निर्देश देऊन रखडलेली भरपाई तातडीने वितरित करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर कृषिमंत्री भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे तुपकर यांनी सांगितले..दरम्यान, राज्यातील डिझेल टंचाईमुळे नांगरणी, मशागत आणि पेरणीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत तुपकर यांनी शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात डिझेल उपलब्ध होत असून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे त्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.