Jaljeevan Scheme Work : ‘जलजीवन’च्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला दंड

Penalty to the Contractor : रिसोड तालुक्यातील चिचांबा पेन येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई केल्याच्या कारणावरून कंत्राटदार धीरज अनिल मालपाणी यांना एक लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Jaljeevan Work
Jaljeevan WorkAgrowon

Washim News : रिसोड तालुक्यातील चिचांबा पेन येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई केल्याच्या कारणावरून कंत्राटदार धीरज अनिल मालपाणी यांना एक लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ही कारवाई केली.

Jaljeevan Work
Jaljeevan Work : ‘सीईओं’कडून झडती अन्‌ ‘जलजीवन’ला गती

चिंचाम्बा पेन येथील जलजीवन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर झालेली आहेत. यामध्ये विहीर, उर्ध्वनलिका, पंपिंग मशिनरी, स्वीच रूम, उंच टाकी, वितरण व्यवस्था इत्यादी कामांचा समावेश आहे. संबंधितांकडून विहिरीच्या जागेचे दानपत्र अप्राप्त असल्यामुळे विहीर, उर्ध्वनलिका, पंपिंग मशिनरी आणि स्विच रूमची कामे सुरू करणे शक्य नव्हते.

परंतु उंच पाण्याची टाकी आणि वितरण व्यवस्था ही कामे वेळेत पूर्ण करणे शक्य असूनही ती न केल्यामुळे सदर योजनेची प्रगती दिसून येत नाही. पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण न झाल्यामुळे गावातील लोकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. वरिष्ठ स्तरावरून घेण्यात येणाऱ्या आढावा सभांमध्ये यामुळे जिल्ह्याची प्रगती कमी दिसत असल्याने वरिष्ठांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे कारण देत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सदर ठेकेदारावर दंड ठोठावला आहे.

Jaljeevan Work
Jaljeevan Mission : परभणीत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’चा जलरथ

जल जीवन मिशनचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत सरपंचांनी सीईओ कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सीईओ वाघमारे यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ठेकेदारांची सुनावणी घेऊन कामातील दिरंगाईबाबत वाघमारे यांनी सक्त ताकीद दिली होती. परंतु एप्रिल महिन्याअखेर म्हणजे ६२ दिवसांचा कालावधी उलटूनही मालपाणी यांनी काम सुरू न केल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.

‘सुरक्षेच्या दृष्टीने काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे’

उंच पाण्याच्या टाकीचे फाउंडेशनचे काम जानेवारी महिन्यातच पूर्ण झाले होते. परंतु सदर टाकीच्या फाउंडेशनचा खड्डा बुजवला नसल्याची बाब सरपंचांनी सीईओ यांच्याकडे तक्रार करून निदर्शनास आणून दिली होती. तसेच सदर टाकीच्या खड्ड्याच्या बाजूला शासकीय इमारती असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते.

याबाबत ठेकेदारांना समज देऊनही त्यांनी हेतूपुरस्सर कामात दिरंगाई केली असल्यामुळे अखेर दंड करावा लागला. यानंतरही कामांमध्ये प्रगती न दिसल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा इशारा सीईओ वाघमारे यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com