
Toll Plaza Fastag New Rule : फास्टॅगच्या समस्यांमुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा कमी, प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासाठी सरकारने नियमावलीत काही बदल केले आहेत. सोमवार (ता.१७) फेब्रुवारीपासून फास्टॅगसाठी नवीन नियम लागू केले. या अंतर्गत, फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स, पैसे कट होण्यास वेळ झाला किंवा फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर अतिरिक्त दंड भरावा लागणार आहे. टोल नाक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा नियम लागू होणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल केले. यामुळे टोल पेमेंट प्रक्रिया सुलभ, टोल नाक्यावर कामगार आणि वाहनधारकांमध्ये होणार वाद कमी करणे, तसेच फास्टॅगमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे बदल केले आहेत अशी माहिती रस्ते वाहतूक विभागाने दिली. या नियमांनुसार, टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी ६० मिनिटे आणि टोल ओलांडल्यानंतर किमान १० मिनिटे फास्टॅग सुरळीत असायला हवा. याकाळात फास्टॅग बंद राहिल्यास अतिरीक्त शुल्क मोजावे लागणार आहेत.
टोल पेमेंट सुलभ करण्यासाठी आणि वाद कमी करण्यासाठी काही अडथळा आल्यास तुम्हाला पैसे रिटर्न मिळणार आहेत. याचबरोबर नवीन नियमांनुसार, वाहनाचा टोल कट झाल्यानंतर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळाने टोल व्यवहार झाला तर फास्टॅग यूजर्सना अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यांच्या मते, फास्टॅग खात्यात कमी बॅलन्स असल्यास आणि व्यवहारात विलंब झाल्यास टोल ऑपरेटर जबाबदार असेल. यापूर्वी वापरकर्ते टोल बूथवरच फास्टॅग रिचार्ज करू शकत होते, पण नवीन नियमानुसार, वापरकर्त्यांना आधी फास्टॅग रिचार्ज करणे बंधनकारक आहे.
टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी, तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसा रिचार्ज शिल्लक आहे याची खात्री करा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. ब्लॅकलिस्टिंग टाळण्यासाठी तुमचे फास्टॅग केवायसी तपशील नियमितपणे अपडेट करा. लांब प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या फास्टॅगची स्थिती तपासून त्यात आवश्यक असलेली शिल्लक आणि अपडेट्स सुनिश्चित करा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.