Crop Insurance : जळकोटला मध्यम हंगामाचा पीकविमा द्यावा ; मंत्री संजय बनसोडेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Mid-Season Adversity : लातूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जळकोट तालुक्यातील पिके पाण्याअभावी सुकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना (मिडसिझनचा) पीक विमा आपल्या अधिकारात असल्याने अधिसूचना काढून सरसकट पीकविमा शेतकऱ्यांना द्यावा अशा सूचना क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांना दिल्या आहेत.
sanjay bansode
sanjay bansodeAgrowon

Latur News : जळकोट तालुक्यात पंचवीस दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिके सुकून जात आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना (Mid season adversity) पीक विमा आपल्या अधिकारात असल्याने अधिसूचना काढून सरसकट पीकविमा शेतकऱ्यांना द्यावा अशा सूचना क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांना दिल्या आहेत.

जळकोट तालुक्यात गेल्या जुलै पासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती अत्यंत दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे.मागील महिन्यात २९ जुलै रोजी जो काही पाऊस झाला होता तो पाऊस जेमतेम होता. त्यामुळे अजून नदी नाल्यांना पाणी आले नाही.सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. शेतीत पेरणी करण्यासाठी खत बी बियाणे ,मजुरी,मशिन वीस हजार रुपये झाला असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.पशुपालकांना वैरणीचा खर्च भेडसावत आहे. जून जुलै महिन्यात जो काही पाऊस झाला.तो अल्प प्रमाणात झाला. मूग, उडीद पूर्ण पिके गेले असून सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ही पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. अशा परिस्थिती शासनाने शेतकऱ्यांना वेळी मदत केली तरच शेतकरी जगेल अन्यथा खूप परिस्थिती बिकट बनणार आहे.

सतत एकवीस दिवस पाऊस नाही झाल्यास मध्यम हंगाम विमा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे तालुक्यात पंचवीस दिवसापासून पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत करावी अशी मागणी भाजपसह आदी पक्षांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com