Surat-Chennai Land Acquisition : सुरत-चेन्नई भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या

Surat-Chennai Highway : सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड आणि सोलापूर परिसरातून जाणाऱ्या रिंग रोडमधील भूसंपादित जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.
Surat-Chennai Highway
Surat-Chennai HighwayAgrowon
Published on
Updated on

Solapur Road News : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड आणि रिंग रोडच्या भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळण्यासाठी सोलापूर-तुळजापूर या महामार्गावर उळे येथे सोमवारी (ता. १९) रयत क्रांती संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले.

सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड आणि सोलापूर परिसरातून जाणाऱ्या रिंग रोडमधील भूसंपादित जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.

तसेच जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना या आधीच मोबदला रकमेची नोटीस मिळाली आहे. पण त्यातील मोबदल्याची रक्कम अत्यंत अल्प दर्शविण्यात आली आहे.

याबाबत यापूर्वीही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतही हा विषय नेला आहे. पण प्रशासनाकडून त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही होत नसल्याने रयतक्रांती संघटनेने संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा ‘रास्ता रोको’ केले.

Surat-Chennai Highway
Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्ग नुकसानग्रस्तांना बैठकीची प्रतीक्षा

या वेळी बोलताना श्री. भोसले म्हणाले, की शेतकऱ्यांच्या महामार्गालगत जमिनीचे जे चालू दर आहेत, त्याच्या चारपटीने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला हा चार पटीने देण्यात यावा.

तसेच जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मागण्यासंबंधी हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

या आंदोलनात अमोल वेदपाठक, शिवानंद सावळगी, परमेश्‍वर गाढवे, महेश भोज, विक्रम गाढवे, श्रीशैल भोज, सचिदानंद चौगुले, हरी चौगुले, चंद्रकांत चव्हाण, काशिनाथ गाढवे, चंद्रकला वेदपाठक, तनुजा मुळे, शांताबाई गाढवे, यशपाल वाडकर, भिवा शिंदे, उषाबाई गाढवे, यशोदा शिंदे आदींसह उळे, कासेगाव, धोत्री, खडकी, तामलवाडी, देवकुरळी, चपळगाववाडी, दुधनी, मैंदर्गी यांसह दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांतील गावकरी, शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com