Paddy Market : धानाला किमान चार हजार रुपये क्‍विंटलचा दर द्या

Paddy Rate : पूर्व विदर्भातील बहूतांश जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. परंतू सद्या धानाला तुटपूंजा दर मिळत असल्याने त्यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नाही.
Paddy Market
Paddy MarketAgrowon
Published on
Updated on

Gondia News : पूर्व विदर्भातील बहूतांश जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. परंतू सद्या धानाला तुटपूंजा दर मिळत असल्याने त्यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नाही. त्यामुळे धनाला प्रती क्‍विंटल किमान चार हजार रुपयांचा दर मिळावा सोबतच एक हजार रुपये बोनस देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक रेखलाल टेंभरे यांनी केली आहे.

राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. त्यानूसार, पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धान लागवड केली जाते. गोंदिया जिल्ह्याला तर राईस सिटी अशी ओळख आहे.

Paddy Market
Paddy Harvesting : पश्चिम पट्ट्यात भाताची कापणी सुरू

भंडारा जिल्हा देखील धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. एकाच पिकावर अवलंबिता असल्याने आणि गेल्या काही वर्षात अपेक्षीत दर मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती अपेक्षीतरित्या सुधारली नाही. धानाला यंदाही केवळ २२०० रुपयांचा हमीभाव जाहिर करण्यात आला.

Paddy Market
Paddy Harvesting : पावसाची उघडीप; भातपीक कापणीला वेग

परिणामी शेतकऱ्यांची पुन्हा आर्थिक कोंडी होणार आहे. धान उत्पादकांचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष साधायचा असल्यास किमान ४०० रुपयांचा हमीभाव त्यासोबतच एक हजार रुपये बोनस दिला पाहिजे.

सद्या मिळणाऱ्या तुटपूंजा दराच्या माध्यमातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच कृषीमुल्य आयोगाने वाढीव दराची शिफारस करावी, असेही पत्रात नमूद आहे.

केंद्रीय कृषीमुल्य आयोगाची शेतीमालाचे भाव ठरविण्याची पध्दतीच चुकीची आहे. त्यामुळे पुर्वापार चालत आलेल्या प्रथेचे पुर्नविलोकन होण्याची गरज आहे. काळानुरुप त्यात सुधारणा अपेक्षीत आहेत. त्याकरीता केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. सोबतच शेतीला दिवसा वीजपुरवठा मिळावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. त्याबाबतही निर्णय झाला पाहिजे.
- रेखलाल टेंभरे, संचालक, जिल्हा बॅंक गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com