Sustainable Farming: वडगांव सहाणी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील योगेश बबन चव्हाण हा प्राणिशास्त्राचा द्विपदवीधर युवा शेतकरी. पुण्याजवळील एका प्रकल्पात नोकरी करत त्याने गावाकडील वडिलोपार्जित शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनास सुरुवात केली. या उपक्रमास कुटुंबातील सदस्य तसेच पुण्यातील ग्राहकांची चांगली साथ मिळाली.