Parbhani ZP Budget : कृषी, पशुसंवर्धन, लघू पाटबंधारे विभागासाठी दोन कोटींवर निधी

Agriculture Budget : परभणी जिल्हा परिषदेच्या २०२५-२६ या वर्षाच्या २० कोटी ८१ लाख ३५ हजार रुपये महसुली खर्चाच्या मूळ अंदाजपत्रकास गुरुवारी (ता. २७) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतिशा माथुर यांनी मान्यता प्रदान केली.
Parbhani ZP
Parbhani ZPAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्हा परिषदेच्या २०२५-२६ या वर्षाच्या २० कोटी ८१ लाख ३५ हजार रुपये महसुली खर्चाच्या मूळ अंदाजपत्रकास गुरुवारी (ता. २७) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतिशा माथुर यांनी मान्यता प्रदान केली. या अर्थसंकल्पीय अंदाज पत्रकात कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, लघू पाटबंधारे या विभागांसाठी मिळून एकूण २ कोटी ४२ लाख ५४ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षांमधील जिल्हा परिषदेची अपेक्षित जमा विचारात घेता २० कोटी ८१ लाख ३५ हजार रुपये महसुली खर्चाचे अंदाजपत्रक व १२ कोटी ७५ लाख ७८ हजार २३५ रुपयांच्या महसुली शिलकेसह सादर करण्यात आले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडकेर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सचिन कवठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, दीपक सामाले उपस्थित होते.

Parbhani ZP
Kolhapur ZP Budget: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ४३ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक सादर

नावीन्यपूर्ण योजना...

यंदाच्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण योजना कृषी विभाग ः बायोगॅस संयंत्र बांधकामासाठी प्रति बायगॅस ११ हजार रुपये पूरक अनुदान.

पशुसंवर्धन विभाग ः तरुण विधवा महिलांकरिता १०० टक्के अनुदानावर २ शेळ्यांचा गट वाटप. करणे, लघू पाटबंधारे विभाग ः नाला खोलीकरण, लहान पाटबंधाऱ्याची कामे तसेच दुरुस्ती करणे.

Parbhani ZP
Buldana ZP Budget : बुलडाणा जि. प. अर्थसंकल्पात ट्रॅक्टर खरेदीसाठी ७५% अनुदानाची तरतूद

पंचायत विभाग ः ग्रामपंचायतींचा लोकोपयोगी सेवा व साहित्य पुरविणे.

शिक्षण विभाग ः शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य, इयत्ता ९ वी व १० वी विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य पुरवणे, आरोग्य विभाग ः ग्रामीण भागातील दुर्धर आजारावरील उपचारासाठी रुग्णांना अर्थसाह्य, समाज कल्याण विभाग ः मागासवर्गीय महिला बचत गटांना ई-रिक्षा पुरविणे.

दिव्यांग कल्याण विभाग ः सार्वजनिक इमारतीमध्ये दिव्यांगासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणे, जुन्या इमारतीत सुविधा निर्माण करणे.

महिला व बाल कल्याण विभाग ः मुलींना व महिलांना व्यावसायीक व तांत्रिक प्रशिक्षण.

परभणी जि.प. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक

२०२५-२६ विभागनिहाय खर्च निधी

विभाग निधी तरतूद

कृषी ७२ लाख ५४ हजार रुपये

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय १ कोटी रुपये

लघू पाटबंधारे ७० लाख रुपये

पाणीपुरवठा व स्वच्छता १ कोटी रुपये

पंचायतराज ५ कोटी ६८ लाख ६९ हजार रुपये

बांधकाम ६ कोटी रुपये

शिक्षण १ कोटी ५० लाख ७ हजार रुपये

आरोग्य २ कोटी १ हजार रुपये

समाज कल्याण (एस.सी.एस.टी.) ६० लाख रुपये

सामाजिक सुरक्षा व दिव्यांग कल्याण ८० लाख रुपये

महिला व बालकल्याण ८० लाख ४ हजार रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com