
Parbhani News : यावर्षीच्या (२०२५) खरीप हंगामात (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) परभणी जिल्ह्याला विविध ग्रेडची १ लाख ४५ हजार ११४ टन रासायनिक खते कृषी आयुक्तलयाने मंजूर केली आहेत. गतवर्षीच्या (२०२४) खरिपाच्या तुलनेत यंदा २१ हजार ८१४ टन अधिक खतसाठा मंजूर करण्यात आला आहे.
यंदा आजवर विविध ग्रेडच्या ११ हजार १४० टन खतांचा पुरवठा झाला. ४ हजार ४६१ टनावर खतांची विक्री झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली. परभणी जिल्ह्यात खतांचा वापर सरासरी १ लाख ९६८ हजार टन एवढा आहे.
येत्या खरिपात सुमारे पावणे पाच लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार विविध ग्रेडच्या १ लाख ५९ हजार ७०० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती.परंतु मागणी पेक्षा १४ हजार ५८६ टन कमी खते मंजूर करण्यात आली.
एप्रिल महिन्यासाठी १० हजार ५९० टन खते मंजूर आहेत. आजवर ११ हजार १४० टन खतांचा पुरवठा झाला. त्यात युरिया ४ हजार ९७८ टन, सुपर फॉस्फेट १ हजार ४५१ टन, डीएपी ३५७ टन, संयुक्त खते (एनपीके) ४ हजार ३५४ टन खतांचा समावेश आहे. ३१ मार्च अखेर २५ हजार ८७९ टन खते शिल्लक होती. यंदाचा पुरवठा व मार्चअखेरची शिल्लक मिळून एकूण ३७ हजार १९ टन खते उपलब्ध होती. त्यातून ४ हजार ४६१ टन खतांची विक्री झाली असून ३२ हजार टनावर खते शिल्लक होती.
गतवर्षीपेक्षा २१ हजार टन अधिकची खते मंजूर
गतवर्षीच्या (२०२४) खरिपात १ लाख ५९ हजार ३०० टन खतांची मागणी केली होती. त्या वेळी कृषी आयुक्तालयाने १ लाख २३ हजार ३०० टन खते मंजूर केली होती.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण २१ हजार ८१४ टन एवढी जास्त खते मंजूर झाली आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा युरिया १४ हजार
९२ टन आणि संयुक्त खते (एनपीके) ९ हजार ७०० टन एवढा जास्त तर डीएपी २ हजार ५३८ टन, सुपर फॉस्फेट ३ हजार ३०० टन, पोटॅश १४० टन एवढा कमी खतासाठा मंजूर झाला आहे.
परभणी जिल्हा सरासरी खत वापर, खरीप हंगाम २०२५ मागणी, मंजूर खते स्थिती (टनांमध्ये)
खताचा प्रकार सरासरी वापर यंदाची मागणी मंजूर खते
युरिया ३२५६९ ५८६०० ४२२९२
सुपर फॉस्फेट १५१०४ १४२०० १५५००
पोटॅश २१४५ ५८०० २१६०
डीएपी १५९८४ २२७०० २१६६२
संयुक्त खते (एनपीके) ३५१६६ ५८४०० ६३५००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.