Papaya Crop : पपई पीक सल्ला

Papaya Orchard Management : पपईच्या झाडास सरासरी तापमान २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवते. परंतु तापमान त्यापेक्षाही जास्त वर गेल्यास पिकास हानिकारक ठरते.
Papaya
PapayaAgrowon

मंजाबापू गावडे

Papaya Farming : पपईच्या झाडास सरासरी तापमान २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवते. परंतु तापमान त्यापेक्षाही जास्त वर गेल्यास पिकास हानिकारक ठरते.

पपई पिकाची पाने जास्तीच्या तापमानामुळे करपतात. पाने गळून पडतात.

फळावर चट्टे पडतात. फळामधील गर खराबी होतो. त्यामुळे फळे पिवळी पडून गळतात.

Papaya
Papaya Market : खानदेशात पपई आवक नीचांकी; दर स्थिर

पपई झाडाची मुळे मांसल असल्यामुळे जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो. त्यामुळे मुळे खराब होतात. मुळांचे अन्नद्रव्ये व पाणी शोषण करण्याचे कार्य मंदावते.

फळाचा आकार लहान राहतो. परिणामी उत्पादन कमी होते.

फळाच्या गरामध्ये साका तयार होतो.

वाढलेल्या तापमानामुळे पपई झाडावर पांढरी माशी, तुडतुडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे पानांचा रंग हिरवट पिवळसर होतो. पानांवर सुरकुत्या पडतात. जास्त प्रादुर्भावामध्ये फळावर पिवळे चट्टे पडतात. त्यामुळे फळांची प्रत खालावते.

Papaya
Papaya Cultivation : ‘अर्ली’ पपई लागवड खानदेशात पूर्ण

उपाय

ठिबक सिंचनाद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळी सिंचन करावे.

खोडाच्या चारही बाजूंनी उसाचे पाचट, वाळलेले गवत, गव्हाचा भुस्सा, पालापाचोळा, लाकडी भुस्सा यांचे आच्छादन करावे. आच्छादनाचा थर साधारण ३ ते ४ इंच इतका खोडाच्या चारही बाजूंनी करावा.

बागेत ६० ते १०० मायक्रॉन जाडीच्या काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक आच्छादन करावे.

झाडावर बाष्परोधक ५ ते ८ टक्के तीव्रतेच्या द्रावणाची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे.

नवीन लागवड केलेल्या झाडांना गोणपाट किंवा जुन्या साड्यांद्वारे सावली करावी.

सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा पंपाने करावे.

पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानांवर पोटॅशिअम नायट्रेट (१ ते १.५ टक्का) द्रावणाची फवारणी करावी.

रसशोषक किडीच्या बंदोबस्तासाठी शिफारशीत घटकांची फवारणी करावी.

मंजाबापू गावडे,

९४२२९२२०६०

(उद्यानविद्या, मध्यवर्ती रोपवाटिका, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com