Amrut Scheme : पनवेल महापालिकेला ‘अमृत’ योजनेमुळे बळ

राज्यातील ४४ शहरांमध्ये मलनिःस्सारण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश झाला आहे.
Panvel Municipal Corporation
Panvel Municipal CorporationAgrowon

Panvel News : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत पनवेल महापालिकेला मलनिःसारण तसेच पाणी पुरवठा (Water Supply) प्रकल्पाकरिता तब्बल ३५५ कोटी ७४ लाख रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास (Rural Development) मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या अनुषंगाने मलनिःसारण प्रकल्पासाठी २०७ कोटी ५८ लाख रुपये तर पाणी पुरवठा प्रकल्पासाठी १४८ कोटी १६ लाख रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Panvel Municipal Corporation
ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला न्यायालयाचा दणका; मनपा, झेडपी निवडणुकींचा मार्ग मोकळा

राज्यातील ४४ शहरांमध्ये मलनिःस्सारण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश झाला आहे.

याशिवाय पाणी पुरवठा प्रकल्पाला ही मान्यता मिळाल्याने पनवेलकरांची पाण्याची समस्या सुटणार आहे मलनिःसारण प्रकल्पासाठी केंद्र शासनामार्फत ६९ कोटी रुपये, राज्य शासनतर्फे ७६ कोटी रुपये अनुज्ञेय अनुदान मिळणार असून पनवेल महापालिकेला खर्चाचा हिस्सा ३० टक्के असणार आहे.

यामध्ये खिडुकपाडा, कामोठे, नौपाडा, खारघर (कोपरा आणि बेलपाडा), ओवे गाव, कळंबोली, मोठा खांदा व ढोंगऱ्याचा पाडा या गावांना जोडण्यात येणार आहे.

तर भिंगारी, पेंधर, टेंभोडे, पिसार्वे, पडघे, तुर्भे, नागझरी, तोंडरे, तळोजा मजकूर, नावडे, रोहिंजण, धाकटा खांदा, तळोजा पाचनंद, वळवली, देवीचा पाडा, पाले खुर्द, घोट, ओवे कॅम्प व घोलवाडी येथे नवीन प्रकल्प उभारणीसाठी निधी दिला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com