Local Issues: पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या नियोजित विकास आराखड्याला (कॉरिडॉर) विरोध करण्यासाठी आणि शहरातील पडीक शासकीय जागांचा वापर भाविकांच्या सोयीसाठी व्हावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. ८) पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. ‘‘पंढरपूर उद्ध्वस्त करू नका, शासकीय जागांचा दुरुपयोग थांबवा’’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता..विकास आराखड्याच्या नावाखाली मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापारी मालमत्ता मोठ्या प्रमाणावर बाधित होणार आहेत. यामुळे शेकडो कुटुंबे विस्थापित होण्याची भीती असून, पंढरपूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा नष्ट होईल, असा दावा आंदोलकांनी केला आहे. सुमारे ५०० हून अधिक दुचाकी आणि सुमारे एक हजार नागरिक, महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात झाली. .Pandharpur Temple Corridor: कॉरिडॉरमध्ये बाधित होणारी मंदिरे, समाध्यांची घेतली माहिती.रॅलीदरम्यान आंदोलकांनी खादी ग्रामोद्योगची जागा, टिळक स्मारक मंदिराची जागा, गोरक्षण संस्थेची मोकळी जागा आणि जुने बसस्थानक या ठिकाणांना भेट देऊन या जागा भाविकांच्या सोयीसाठी वापरण्याची मागणी केली. .समितीच्या मते, पंढरपुरात हजारो कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अनेक शासकीय इमारती सध्या धूळखात पडल्या आहेत. तसेच लाखो चौरस फूट शासकीय जागांवर अतिक्रमणे आहेत किंवा त्या मोकळ्या आहेत. या जागांचा वापर न करता नागरिकांची घरे पाडणे चुकीचे आहे, असा सूर या आंदोलनात उमटला. या आंदोलनानंतर बचाव समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले..Pandharpur Temple Corridor: चंद्रभागा नदीवरील पूल, प्रदक्षिणा मार्ग रुंदीकरणाचा आराखडा सादर.प्रमुख मागण्या...प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा.मंदिर परिसरातील मालमत्ता पाडण्याऐवजी उपलब्ध शासकीय जमिनींवर भाविकांना सोयी-सुविधा द्याव्यात.विस्थापितांच्या रोजगाराचा आणि निवाऱ्याचा प्रश्न गंभीर करू नये..शहरात लाखो चौरस फूट शासकीय जागा मोकळ्या आहेत, असे असताना मंदिर परिसरातील घरे पाडून हजारो कोटींचा प्रकल्प आणणे योग्य नाही. यामुळे मंदिर परिसर उद्ध्वस्त होणार असून शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा नष्ट होईल. आमची मागणी आहे की हा कॉरिडॉर प्रकल्प त्वरित रद्द करावा.- अभयसिंह इंचगावकर कुलकर्णी, अध्यक्ष, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.