Agricultural Market: पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती हरीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीत तब्बल ६६० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून, समितीचा देशातील उच्चतम बाजार समित्यांमध्ये समावेश करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती या सभेत देण्यात आली..पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. सचिव कुमार घोडके यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. बाजार समितीच्या बँकेतील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना अधिक सुविधा देऊन व्यापारवाढ साधण्यासाठी आवश्यक ती सर्व विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली जात असल्याचे सभापती गायकवाड यांनी सांगितले..Paithan Market Committee: तेलवाडीत साकारणार पैठण बाजार समितीचा उपबाजार.या प्रसंगी उपसभापती राजू गावडे, दिनकर मोरे, कल्याणराव पाटील, लक्ष्मणराव धनवडे यांच्यासह सर्व संचालक, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले..Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार .आर्थिक उलाढाल दृष्टिक्षेपातबाजार समितीत वर्षभरात एकूण ६६० कोटी रुपयांची उलाढाल झाली. यातून समितीला ५ कोटी ४२ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून, सर्व खर्च वजा जाता २ कोटी ४८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे..एकूण उलाढालीत सर्वाधिक वाटा बेदाण्याचा (५०१ कोटी) राहिला. या व्यतिरिक्त डाळिंब (६० कोटी), फळे व भाजीपाला (४२ कोटी), भुसार धान्य (२३ कोटी), कांदा (२३ कोटी), केळी (६ कोटी), जनावरे (४ कोटी) आणि वैरण (१ कोटी) अशी उलाढाल नोंदवली गेली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.