Environmental Issues: पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर अंकुश संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी (ता. १५) तीव्र वळण लागले. .आंदोलनाचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर आणि नागेश काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. संतप्त नागरिकांनी पोलिसांची गाडी रोखून धरत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात सुमारे दोन तास तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते..Panchganga River Pollution: प्रदूषण करणाऱ्या प्रोसेस उद्योगांवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी : धनाजी चुडमुंगे.इचलकरंजी शहराला मजरेवाडी उद्भव केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद करावा तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करून स्पष्ट आश्वासन द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी इचलकरंजी महानगरपालिका, प्रक्रिया उद्योग, उद्योजक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला..Panchganga River Pollution: पंचगंगेचे प्रदूषण रोखा, अन्यथा शुक्रवारी ‘पंचगंगा काठ’ बंद.या वेळी काही आंदोलकांनी टायर पेटवून आंदोलन अधिक तीव्र केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांची सुटका केल्यानंतर वातावरण निवळले. आंदोलनात टाकवडे, अब्दुललाट, शिरढोण, नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ, कुरुंदवाड, हेरवाड आणि तेरवाड येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहर तसेच इचलकरंजी नगरपालिका कृष्णा पाणी उपसा केंद्र परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय होईपर्यंत सोमवारपासून पालिका चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.