Ahilyanagar News: संगमनेरला कवी अनंत फंदी, लोकशाहीर विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांच्यासह लोककलावंतांची मोठी परंपरा लाभली आहे. तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. अनेक अडचणींवर मात करून ही लोककला पुढे नेण्याचे काम रघुवीर खेडकर यांनी केले आहे..पद्मश्री पुरस्कार मिळाला हा खऱ्या अर्थाने लोककलेचा सन्मान आहे, असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने लोक कलावंत रघुवीर खेडकर यांचा संगमनेर येथे रविवारी (ता. ८) नागरी सत्कार करण्यात आला..PadmaShri 2025: पर्यावरणपूरक शेतीचे प्रणेते सुभाष शर्मा यांना ‘पद्मश्री’ .प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, राजेश मालपाणी, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नूर मोहम्मद शेख, प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. संजय दळवी, हिरालाल पगडाळ, नामदेव गुंजाळ यांच्यासह श्री. खेडकर यांचे कुटुंबीय व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते..Seed Rakhi : पद्मश्री राहीबाईं पोपेरेकडून यंदाही चंद्रकांत पाटलांना बीज राखीची भेट.श्री. थोरात म्हणाले, की तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ - उतार सुरू असताना देखील श्री. खेडकर यांनी आपले जीवन या कलेसाठी समर्पित केले. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यभरातील तमाशासह सर्व लोककलावंतांचा सन्मान आहे. १८५७ चा उठाव, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही या लोककलाकारांचे मोठे योगदान राहिले आहे..कोरोना काळामध्ये श्री. खेडकर यांनी कलावंत सांभाळले. आज या मनोरंजन क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली असून स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन आव्हाने पेलावी लागत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री देत लोककलेचा खरा सन्मान केला आहे. या वेळी रघुवीर खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.