Gondia News: गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला देण्यात आलेले ६ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्णत्वास गेले आहे. .मात्र अद्यापही अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विकता न आल्याने उद्दिष्टामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे..Telangana Paddy Procurement : धान खरेदीत तेलंगणाचा नवा विक्रम; ७०.७२ लाख टन धानाची हमीभावाने खरेदी.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चअखेरपर्यंत धान खरेदीची मुदत असली तरी सध्या खरेदी केंद्रांवर धानाची आवक कायम आहे. सुरुवातीला १२ लाख ५० हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा वाढीव उद्दिष्ट देण्यात आले असून, तेही जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे..जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत ६७ हजार ४८६ शेतकऱ्यांकडून २५ लाख १२ हजार २६६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. शासनाच्या हमीभावाने धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे..Paddy Procurement: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ केंद्रांवर १७ हजार क्विंटल भातखरेदी .दरम्यान, धान खरेदी सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांसाठी सुमारे ५५७ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने चुकारे अदा केले जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले..सध्या जिल्ह्यातील ९ लाख ३७ हजार ५३७ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी बहुसंख्य शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान विक्री केली आहे. धान खरेदी सुरळीत सुरू राहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, निधी वेळेत उपलब्ध झाल्यास चुकाऱ्यांचाही प्रश्नही मार्गी लागण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.