Paddy Procurement Moisture Norms: भाताच्या खरेदीसाठी ओलाव्याबाबतचे निकष शिथिल करण्याचा मागणी तामिळनाडू (Tamil Nadu) राज्य सरकारने केली होती. पण ही मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. अधिक ओलावा असलेल्या भाताची खरेदी केल्यास साठवणुकीदरम्यान नुकसान होऊ शकतो, असे कारण केंद्राने दिले आहे. याबाबतची माहिती बुधवारी संसदेत देण्यात आली..अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार, तामिळनाडू सरकारने भाताचा ओलाव्याबाबतचा निकष शिथिल करुन तो १७ वरून २२ टक्के गृहित धरण्याची विनंती केली होती. मात्र, तमिळनाडू सरकारच्या विनंतीला सहमती दर्शवलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे..Paddy Procurement: धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण.भात कांडप करण्याआधी तो वाळवावा लागतो; त्यात अधिक ओलावा असल्यास साठवणुकीदरम्यान त्याचा साठा कमी होतो आणि उतारा कमी मिळतो. अधिक ओलावा असलेले भात लवकर खराब होते. त्यात बुरशी होऊन त्याचा रंग बदलतो आणि किडीचा प्रादुर्भाव होतो, असे बांभनिया यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे..Telangana Paddy Procurement : धान खरेदीत तेलंगणाचा नवा विक्रम; ७०.७२ लाख टन धानाची हमीभावाने खरेदी.भात खरेदीच्या टप्प्यात पाणी साचून राहू नये म्हणून त्याचा निचरा करण्यात यावा, अशी वारंवार सूचना राज्य सरकारांना करण्यात आल्या आहे. ओलाव्याचे निकष शिथिल करण्यामुळे शेतकऱ्यांवर थेट आर्थिक परिणाम होत नाही. म्हणून आता या सवलतीवर विचार केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. .केंद्र सरकारने २०२५-२६ मधील (जुलै-जून) खरीप हंगामातील १६ लाख टन (तांदळाच्या बाबतीत) भात खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. फोर्टिफाइड राईस कर्नल्स (FRK) च्या नमुना घेण्याच्या निकषांमध्ये शिथिलता आणण्याबाबत, केंद्राने या नमुन्याचा आकार १० टनांवरून २१ टन आणि पॅकेजिंगचा आकार २५ किलोवरून ५० किलो केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.