Gondiya News: गोंदिया जिल्ह्यात शासनाने दिलेल्या धान खरेदीच्या मर्यादेच्या उद्दिष्टाची पूर्तता झाल्याने सरकारी खरेदी तात्पुरती थांबली आहे. परिणामी नोंदणी केलेल्या सुमारे ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे धान विक्रीसाठी अडकून पडले असून, त्यांनी शासनाने खरेदीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सरकारी धान खरेदीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे..जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर धान उत्पादन होते. यंदा धान विक्रीसाठी १ लाख ३२ हजार ६९४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र आतापर्यंत ४८८ खरेदी केंद्रांमार्फत सुमारे ८२ हजार शेतकऱ्यांकडून २५ लाख ५२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे..Paddy Procurement: गोंदियातील धान खरेदीचे २४८ कोटींचे चुकारे थकीत.शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला २७ लाख ५२ हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबली आहे.दरम्यान, सुमारे ५० हजार ७३६ शेतकरी अद्याप धान विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. बाजारात सध्या धानाचे दर कमी असल्याने शेतकरी सरकारी खरेदी केंद्रावरच धान विक्रीला प्राधान्य देत आहेत. मात्र खरेदीची मर्यादा संपल्याने अनेक शेतकरी दररोज केंद्रांवर चकरा मारत असून, शासनाने लवकरात लवकर खरेदी मर्यादा वाढवावी, अशी मागणी होत आहे..यंदा जिल्ह्यातील खरेदी केंद्रांमार्फत आतापर्यंत ६०१ कोटी १० लाख रुपयांचे धान खरेदी व्यवहार झाले आहेत. मात्र त्यापैकी ३७१ कोटी ४५ लाख रुपयांची देयके अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. या थकीत देयकांमुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, पुढील हंगामासाठी लागणाऱ्या खर्चावर त्याचा परिणाम होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.