PM Poshan Shakti: राज्यातील शाळांमध्ये ६८ हजारांवर परसबागा विकसित

Best Backyard Garden Competition: राज्यातील ६८ हजाराहून अधिक शाळांमध्ये ‘पंतप्रधान पोषण शक्ती’ योजनेअंतर्गत परसबागा तयार करण्यात आले असून, त्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली जात आहे.
PM Poshan Shakti Scheme
PM Poshan Shakti SchemeAgrowon
Published on
Updated on

Pune News : शासनाच्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील ६८ हजार ७०४ शाळांमध्ये परसबागा विकसित झाल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, परसबागा निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीही उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकविलेला भाजीपाला, फळे आदींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

PM Poshan Shakti Scheme
CM Employment Scheme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यंदा १९०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे. ताजा भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. या योजनेअंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती.

PM Poshan Shakti Scheme
Agriculture Scheme : कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

या उपक्रमाकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी विभागातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेता येणार आहे. उत्कृष्ट परसबाग स्पर्धाचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात येईल. परसबाग स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण, कृषी, आरोग्य, विभागातील अधिकारी तसेच आहारतज्ज्ञ व स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांची समिती गठीत करणार आहे. उत्कृष्ट परसबागांचे १०० गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी निकषही ठरविण्यात आले आहेत.

नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार निकाल

या स्पर्धेचे मूल्यांकन ऑक्टोबर २०२५ अखेर तालुकास्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक घोषित करतील. जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल नोव्हेंबर २०२५ अखेर जाहीर करण्याची जबाबादारी संबंधित जिल्ह्यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. विजेत्या शाळांना त्यांची बक्षिसाची रक्कम डिसेंबर २०२५ अखेर देण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com