Ahilyanagar News: यांत्रिकीकरणाचा लाभ देण्यासाठी ‘महाडीबीटी’वर मागणी केलेल्या सुमारे पावणेचार लाख शेतकऱ्यांची लॉटरीअंतर्गत निवड झाली आहे. त्यात मागणी असलेल्या ट्रॅक्टरचे सर्वाधिक १ लाख ४२ हजार ३४१ लाभार्थी निवडले आहेत. कांदाचाळ, कडबाकुट्टी, रोटावेटरचेही लाभार्थी अधिक आहेत. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. .महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) तत्त्वावर कृषी समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत राज्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे..Krushi Samruddhi: ‘कृषी समृद्धी’ला अखेर मुहूर्त.या योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. या योजनेअंतर्गत ८० टक्के खर्च महाडीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांना वैयक्तिक व सामूहिक गुंतवणुकीच्या घटकावर आधारित सध्या कार्यान्वित असलेल्या विविध योजनांद्वारे करण्यात येणार आहे..यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, भाडेतत्त्वावरील कृषी अवजारे बॅंक, सूक्ष्म सिंचन, मूल्य साखळी विकास आदी बाबींचा समावेश आहे. कृषी समृद्धी योजनेमधील घटक महाडीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकपणे राबवले जात आहेत. यंदा शासनाने ट्रॅक्टर व इतर पायाभूत सुविधा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी निवड केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले..Krushi Samruddhi Yojana : कृषी समृद्धीचा आराखडाच नाही.ट्रॅक्टरचे कोटेशन वाढवले‘महाडीबीटी’वर ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदानाची मागणी केलेल्या सर्वाधिक शेतकऱ्यांची निवड केली आहे. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ३४१ शेतकरी निवडले आहेत. राज्यात निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा आकडा मोठा आहे. निवडीनंतर लाभार्थी कागदपत्रे अपलोड करतो. त्यानंतर ट्रॅक्टर विक्रेत्यांकडून कोटेशन घेऊन कृषी विभागाला दिल्यावर कृषी विभागाने पूर्वसंमती दिल्यावर लाभार्थी ट्रॅक्टर खरेदी करतो..उपकृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन खरेदी बीलाप्रमाणे ट्रॅक्टर असल्याचे खात्री केल्यानंतर अहवाल दिल्यावर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. एकाचवेळी एवढ्या प्रमाणात लॉटरीतून शेतकरी निवडल्याने आपसूकच विक्रेत्यांकडून कोटेशन घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. त्याचा फायदा घेऊन काही विक्रेत्यांनी ट्रॅक्टरच्या किमती ५० ते ७० हजारांनी वाढविल्याचे कोटेशन दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील विजय खंदारे या शेतकऱ्यांनी सांगितले, की ट्रॅक्टरला १ लाख ते १ लाख २५ हजारांचे अनुदान मिळते. मात्र कोटेशन मागणी वाढताच विक्रेत्यांनी मागील दोन-तीन महिन्यांच्या किमतीपेक्षा वाढवून कोटेशन दिले आहेत. सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. पण विक्रेते अशा पद्धतीने अधिक पैसे घेत असतील तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे..पाच वर्षांत यंदा सर्वाधिक लाभार्थी‘महाडीबी’वर कृषी अवजारांसाठी अर्ज करणाऱ्यांपैकी यंदा सर्वाधिक शेतकऱ्यांची लॉटरीतून निवड केली आहे. यंदा ट्रॅक्टरसाठी १,४२,३४१, कृषी अवजारांसाठी २,२४,६१५, अवजारे बॅंकासाठी ४५६, कांदा चाळ उभारणीसाठी ६,१९७ असे ३ लाख ७३ हजार ६०९ लाभार्थी निवडले आहेत. याआधी २०२० ला ३८६२ लाभार्थी, २०२१ ला ४३ हजार २८९ लाभार्थी, २०२२ ला ७७ हजार ८८३ लाभार्थी, २०२३ ला १४ हजार ८०९ लाभार्थी, २०२४ ला ६ हजार ३५१ लाभार्थी निवडले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.