Agristack Yojana : अॅग्रीस्टॅकअंतर्गत २ लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी

Farmer ID : शेतकरी ओळख क्रमांकामुळे (फार्मर आयडी) पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल.
Agristack Yojana
Agristack Yojana Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमाअंतर्गत गुरुवारपर्यंत (ता. २०) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील २ लाख ३० हजार ५३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी २ लाख २२ हजार ५८ शेतकऱ्यांना ओळखपत्र (फार्मर आयडी) देण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ५२७ पैकी १ लाख २८ हजार ३६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यापैकी १ लाख २३ हजार ८९२ शेतकऱ्यांना आयडी प्राप्त झाले. हिंगोली जिल्ह्यात १ लाख २ हजार १६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यापैकी ९८ हजार १६६ शेतकऱ्यांना आयडी प्राप्त झाले आहेत. प्रत्येक शेतकरी खातेदारास एक विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राबविली जात आहे.

Agristack Yojana
Agristack Scheme : कृषी सहायकांचा ‘ॲग्रीस्टॅक’वरील बहिष्कार अंशतः मागे

शेतकरी ओळख क्रमांकामुळे (फार्मर आयडी) पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल.

पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता राहील. पीकविमा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकरी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल. लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही.

Agristack Yojana
Agristack Yojana : सांगलीत ॲग्रीस्टॅकच्या नोंदणीसाठी समन्वयाचा अभाव

शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल. ‘अॅग्रीस्टॅक’अंतर्गत शेतकरी ओळखपत्रासाठी जनसुविधा (सीएससी) केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा अॅग्रीस्टॅक

शेतकरी नोंदणी स्थिती

तालुका एकूण शेतकरी खातेदार नोंदणी केलेले शेतकरी

परभणी १,०३,१७३ २२,९९८

जिंतूर ९५,०७७ २८,४३२

सेलू ८१,४९८ १६,३७५

मानवत ४१,६३५ १०,३०८

पाथरी ५५,२१५ १२,८४६

सोनपेठ ३३,४०० १२,६०६

गंगाखेड ७६,४९६ १२,६४८

पालम ४९,९२२ ११,७६२

पूर्णा ६४,५७१ १७,०७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com