Energy Workshop : नूतनीकरणक्षम ऊर्जाविषयक तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

Internews Earth Journalism Network-'EJN : या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संवादकांनी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्टपर्यंत आहे.

Orange Workshop
Orange WorkshopAgrowon

Renewable Energy : भारतात नूतनीकरणक्षम (रिन्युएबल) ऊर्जेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत ‘इंटरन्यूज अर्थ जर्नालिझम नेटवर्क-‘ईजेएन’ (Internews' Earth Journalism Network -EJN) या संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यातील संवादकांसाठी तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संवादकांनी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्टपर्यंत आहे.

भारताला आवश्यक असलेल्या एकूण ऊर्जेपैकी निम्मी ऊर्जाही नूतनीकरणक्षम पर्यायांपासून मिळवण्याचा व कार्बन उत्सर्जन एक अब्ज मेट्रिक टनांनी कमी करण्याचा उद्देश ठेवून संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य हे नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या वापरात आघाडीवर आहे. या ऊर्जेच्या वापराचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ऊर्जा धोरणाची अंमलबजावणीचा आढावा घेणे, लोकांमध्ये जागृती करणे यासाठी ‘इंटरन्यूज अर्थ जर्नालिझम नेटवर्क-‘ईजेएन’ ‘ईजेएन’ हे संवादक, संशोधक, विषय तज्ज्ञ, धोरणकर्ते व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे.


Orange Workshop
Crop Protection Workshop : अवकाळी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी पीक संरक्षण कार्यशाळा

या संस्थेने संवादकांसाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे ५ ते ७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील छापील, ऑनलाइन, रेडिओ व दूरचित्रवाणी अशा विविध प्रकारच्या माध्यमातील संवादक अर्ज करू शकतात. त्यामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जेसंबंधीचे संशोधन व इतर महत्त्वाचे पैलू यांची माहिती देऊन संवादकांच्या वृत्तांकन व अहवाल निर्मिती कौशल्यात विकास होईल, यादृष्टीने कार्यशाळेच्या सत्रांची आखणी केली आहे. निवड झालेल्या संवादकांच्या प्रवास, निवास, भोजन यासह नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती प्रकल्पास भेट यांची व्यवस्था आयोजकांकडून केली जाईल.


Orange Workshop
Banana Production Workshop : केळी उत्पादन, हाताळणी, प्रक्रियेवर उद्या कार्यशाळा

आवश्यक पात्रता ः
संवादकांनी कार्यशाळेचे सर्व दिवस उपस्थित राहिले पाहिजे. विज्ञान/पर्यावरण विषयावरील अहवाल सादर केल्याचा अनुभव, इंग्रजी व मराठी समन्वयाची क्षमता आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मुद्यांवरील सादरीकरणात रुची असणे आवश्यक आहे. कार्यशाळेतून निर्माण झालेला अहवालाच्या पुनर्प्रकाशनासाठी अनुमती देणे आवश्यक असेल.

अर्ज कसा करावा?
अर्ज दाखल करण्याची लिंक ः

https://earthjournalism.net/opportunities/communicators-workshop-on-renewable-energy-in-chhatrapati-sambhaji-nagar-aurangabad
येथे जाऊन ‘apply now’ बटणावर क्लिक करावे.
अगोदरच अकाउंट असल्यास लॉग इन (logged in) करावे. पासवर्ड टाकून अर्ज भरावा.
अर्ज भरताना थांबायचे असल्यास ‘Save Draft’ वर क्लिक करू शकता.
कार्यशाळेतील संपूर्ण उपस्थितीसाठी वरिष्ठ अथवा पर्यवेक्षक यांच्या सहमतीचे पत्र आवश्यक. तसेच अर्जदारांनी कामाचे दोन नमुने किंवा लिंक्स जोडणे आवश्यक आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२३. अंतिम मुदतीनंतर दाखल केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जासंबंधी अडचण आल्यास केवळ info.ejn@internews.org वर ई-मेल करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com