Organic Agriculture Product : सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रमाणीकरण गरजेचे

Organic Farming : शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. सेंद्रिय शेतीमाल, उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रमाणिकरण करून घेतले पाहिजे.
Organic Farming
Organic Farming Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. सेंद्रिय शेतीमाल, उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रमाणिकरण करून घेतले पाहिजे. विषमुक्त, पर्यावरण पूरक शेती करावी लागेल, असा सूर प्रतमी अॅग्रो फाउंडेशन, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परभणी कृषी विज्ञान केंद्र यांच्या तर्फे जिंतूर रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहामध्ये सेंद्रिय शेती उत्पादनाचे प्रमाणिकरण, मानकीकरण, उगम आणि बाजारातील संधी या विषयावर परिसंवाद आणि कार्यशाळेत मंगळवारी (ता.४) उमटला.

या वेळी जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्माचे) प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, प्रतमी अॅग्रो फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मिनी चक्रवर्ती,

Organic Farming
Organic Certification Course : सेंद्रीय प्रमाणीकरण अभ्यासक्रमाला वाढती मागणी

संचालक तनुश्री मुखर्जी, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण तज्ज्ञ हर्षल जैन, गुलाब ऑइल व फूड्‍सचे वरिष्ठ व्यवस्थापक संकेत मोदी, हळद उत्पादक प्रक्रिया उद्योजक शेतकरी नरेश शिंदे, अमित तुपे, निखिल यादव, आत्माचे रवी माने, प्रमोद रेंगे, अभिजित देशमुख, प्रकाश सोळंके आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, की शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

Organic Farming
Organic Certification : राज्याची लवकरच सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा

डॉ. क्षीरसागर म्हणाले, की शेतकऱ्यांनी बाजारपेठेचे सर्वेक्षण करून शेतमाल प्रक्रियेचे तंत्र समजून घेतले पाहिजे. शेतकरी गटांनी एकत्रित येऊन स्थानिक परिसरात उपलब्ध शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कच्चा माल उच्च दर्जाचा असला पाहिजे.

जैन म्हणाले, की सेंद्रिय शेतीमाल, उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रमाणीकरण महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमालाचे विपणन तंत्र माहीत करून घेतले पाहिजे. जिल्ह्यातील आत्मा अंतर्गत स्थापन सेंद्रिय शेती गटांचे शेतकरी उपस्थित होते. या वेळी सेंद्रिय शेतीमाल खरेदी विक्री बाबत आवश्यक मानके, बाजारातील संधी आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com