Organic Curb : सेंद्रिय कर्ब वाढीचे उपाय

Indian Agriculture : जमिनीपेक्षा शेणाच्या ढिगावर एखाद्या वनस्पतीची जास्त चांगली वाढ होते हे कोणाचे तरी लक्षात आले व त्याने शेण कुजून तयार झालेले खत जमिनीत दिले असता पीक जास्त चांगले येते.
Organic Curb
Organic CurbAgrowon
Published on
Updated on

प्रताप चिपळूणकर

Organic Curb Growth Solutions : जमिनीपेक्षा शेणाच्या ढिगावर एखाद्या वनस्पतीची जास्त चांगली वाढ होते हे कोणाचे तरी लक्षात आले व त्याने शेण कुजून तयार झालेले खत जमिनीत दिले असता पीक जास्त चांगले येते हे मानवाच्या केव्हातरी लक्षात आल्यापासून शेणखत कंपोस्टच्या वापराला सुरुवात झाली असावी, आजही एक एकरसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळण्याची शिफारस केली जाते.

मी याच मुशीतून तयार झालेला असल्यामुळे स्वतःकडील शेणखत तसेच शक्य तितके बाहेरून विकत घेऊन शेणखत, कंपोस्टचा वापर ३०-३५ वर्षे केला. १९९० नंतर भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर या शास्त्राने असे शिकविले, की चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे असून, जमिनीबाहेर कुजण्याची क्रिया न करता ती थेट जमिनीतच केली पाहिजे.

Organic Curb
Agriculture Fertilizers : नॅनो खतांचा वापर फायदेशीरच

कुजणारा पदार्थ जमिनीला द्या, कुजलेला नको. त्यामुळे मी पिकांना चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत वापरणे बंद केले. कुजणारा पदार्थ कोणता वापरणे शक्य आहे त्याची चाचपणी सुरू केली. असा पदार्थ बाजारातून आणणे शक्य नाही. पहिला पर्याय उसाचे खोडवे तुटल्यानंतर मिळणाऱ्या पाचटाचा समोर आला.

शक्य तो जागेला फुकट मिळणारा पदार्थच वापरण्याचे ठरले होते. पाचट वापराचे प्रयोग करण्यात १५ वर्षे गेली. संपूर्ण पाचट कुजवूनही ऊस उत्पादनात अपेक्षित वाढ मला दिसून आली नाही. त्यानंतर उसाचे जमिनीत राहणारे अवशेष खोडकी, मुळांचे जाळे कुजविण्याचा निर्णय घेतला. उसाचे खोडके परत परत उगवून येते. हे उगवून देऊन चार-पाच पाने येऊन देऊन तणनाशक फवारून ते नियंत्रणात आणले. खोडवे व इतर तणे ही तणनाशकांचा वापर करून नष्ट केले. उसाच्या जुन्या सरीवरंब्यावरच पुढील पिकाची पेरणी टोकण पद्धतीने केली. खरिपात शून्य मशागत तंत्राने भात पेरणी केली.

भू-सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास

आमच्या शैक्षणिक काळात फक्त सेंद्रिय खत टाकण्याची शिफारस केली जात असे. या सेंद्रिय खताचा जमिनीला नेमका काय फायदा होतो हे सांगत असता सुपीकता वाढते, जलधारण शक्ती वाढते, हवा खेळती राहते, पिकाला त्यातील अन्नद्रव्ये उपलब्ध होतात असे शिकविले जाई. शेणखत नेमके कसे वापरले जाते, ते संपून कसे जाते याबाबत काहीही सांगितले जात नाही.

Organic Curb
Agriculture Research : गादमाशीला प्रतिकारक जर्मप्लाझमचे संशोधन

याबाबत शेतकरी कसा विचार करतात ते पाहू. शेणखत हे एक प्रकारचे पिकाचे अन्न आहे. संपूर्ण जमिनीला दरवर्षी उपलब्धतेअभावी आणि आर्थिक टंचाईमुळे वापरणे शक्य नाही. मग या दोन तुकड्यांना या वर्षी टाकू; बाकी पुढील वर्षी पाहू असे ठरविले जाते. त्याऐवजी २-३ रासायनिक खताची पोती जास्त टाकू. एकदा भरपूर शेणखत मिसळले की २ ते ३ वर्षे नाही वापरले तरी चालते. मीही या समजुतीचे प्रमाण मानून सेंद्रिय खत व्यवस्थापन करीत असे.

डॉ. एफ. जे. स्टिव्हन्सन आपल्या ‘ह्यूमस केमिस्ट्री’ पुस्तकात लिहितात, की तुम्ही कितीही सेंद्रिय खत वापराकडे दुर्लक्ष केले तरी नवी जमीन पहिली १५ ते २० वर्षे निसर्गाने दिलेल्या सेंद्रिय खतावर चांगले उत्पादन देतात. त्यानंतर उत्पादन घटत जाते. बागायती होऊन बारमाही पिके घेऊ लागल्यानंतर १५ ते २० वर्षांनंतर सर्वत्र उत्पादन घट दिसून येत आहे.

‘कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी’ या पुस्तकातून एक संदर्भ उपलब्ध होतो. अमेरिकेत शास्त्रज्ञांनी जमिनीत कोठे कोठे नत्र कसा साठविला गेला आहे, यावर संशोधन केले असता असे दिसून आले, की ९१ टक्के नत्र सेंद्रिय कणांना धरून आहे. ८.५ टक्के नत्र जिवंत वनस्पतीत आहे. (हे पूर्ण वाढलेल्या जंगलाचे पृथक्करण आहे.)

तर फक्त ०.५ टक्का नत्र खनिज कणांना चिकटून राहतो. जमिनीत ९९.५ टक्के खनिज कण आणि ०.५ टक्का सेंद्रिय कण असतात. आता आपल्या सर्व जमिनीत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी ०.२ ते ०.३ टक्का राहिली आहे. मग उत्पादन पातळी राहणार कशी? इतर सर्व अन्नद्रव्यांबाबत वरीलप्रमाणेच थोडे कमी जास्त अहवाल मिळतील. दरवर्षी प्रत्येक पिकाला भरपूर सेंद्रिय खत दिले तरच उत्पादन पातळी राखणे शक्य आहे. याला योग्य पर्याय शोधणे गरजेचे आहे.

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com