Nagpur News: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बळ देणारा नर्सरी कायदा अस्तित्वात यावा यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच या संबंधित अध्यादेश काढण्याच्या सूचना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी (ता. १४) दिल्या..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अॅग्रोव्हिजनची संत्रा नर्सरी धोरण समिती, राज्याचा कृषी व फलोत्पादन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास रस्तोगी,.Interview with Dattatray Bharane: बळीराजा जिद्दीने पुन्हा उभा राहील.कृषी आयुक्त सूरज मांढरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, एनआरसीसीचे डॉ. दास, अॅग्रोव्हिजनचे सल्लागार डॉ. सी. डी. मायी, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार उमेश यावलकर, श्रीधर ठाकरे, रवींद्र बोरटकर, मोरेश्ववर वानखेडे, सुधीर दिवे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते..या बैठकीत सुरुवातीला बोलताना श्री. गडकरी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियमन १९६९ याअंतर्गत शेतकऱ्यांना फळांची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळावीत हा उद्देश आहे. फळबागांमध्ये प्राथमिक रोपाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण फळबाग वाढीस चार-पाच वर्षे लागतात आणि जर चांगली रोपे त्यांना मिळाली नाहीत तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते..Dattatray Bharane: शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी होणार : कृषिमंत्री भरणे.ही बाब गंभीर असून शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न या विषयाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे उत्तम प्रकारची रोपे तयार होणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने राज्य सरकारने नियमांमध्ये बदल करून उत्तम नर्सरीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने काही सुधारणा शेतकऱ्यांनी सुचविल्या आहेत, त्या सूचनांचा विचार कृषी विभागाने करावा.’’.या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून व राज्य शासनाचा कृषी विभाग आणि पीकेव्हीच्या माध्यमातून दर्जेदार रोपवाटिका व रोपमळे यासंदर्भात डॉ. शशांक भराड, डॉ. पंचभाई आणि सहसंचालक कृषी यांच्याकडून यावेळी मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर विस्तृत चर्चा झाली. तसेच उत्तम नर्सरी नियोजनाच्या दृष्टीने पुढील अध्यादेश काढण्याच्या सूचना कृषिमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीच्या शेवटी अधिकाऱ्यांना दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.