Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला विरोधच

Sharad Pawar : शक्तिपीठ महामार्ग अनावश्यकच असून, त्याला माझा विरोधच राहील, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग अनावश्यकच असून, त्याला माझा विरोधच राहील, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. कोल्हापुरात होणाऱ्या महामार्गविरोधी राज्यव्यापी परिषदेस हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या श्री. पवार यांची बुधवारी (ता.४) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे व शिवाजी मगदूम यांनी भेट घेतली. या वेळी श्री. फोंडे यांनी सांगितले, की पर्यायी दोन महामार्ग असताना, तसेच मागणी नसताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात आहे.

Sharad Pawar
Shaktipeeth Highway : ‘शक्‍तिपीठ’मधून कोल्हापूरला वगळले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द

कोल्हापूरमधील सहा तालुक्यांतील ५,१२८ एकर जमीन या महामार्गात संपादित होणार आहे. मुख्यमंत्री यावर भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. या विरोधात आंदोलन आक्रमक करण्यासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची कोल्हापूर येथे राज्यस्तरावरील सर्व पक्षांच्या प्रमुखांची राज्यव्यापी परिषद घेऊन पुढील रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले.

Sharad Pawar
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द न केल्यास आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही

यावर श्री. पवार म्हणाले, की शेतकरी या महामार्गास विरोध करत असतील तर त्यामागे त्यांची ठोस कारणे आहेत. मला प्रथम दर्शनी हा महामार्ग अनावश्यक वाटतो. पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत, त्यामुळे महामार्ग रद्द व्हायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आम्ही दोघेही येऊ.

‘संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार’

‘‘मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर संख्याबळानुसार ठरणार आहे. आताच मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर व्हावे, अशा आग्रहाची गरज नाही. काँग्रेस, ठाकरे गट किंवा आमचा कोणाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो. तिन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ,’’ असे प्रतिपादन श्री. पवार यांनी बुधवारी हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषदेत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com