Politics News : पाटण्यात पंतप्रधान मोदींच्या विरोधात विरोधक एकवटले

Chief Minister Arvind Kejriwal : या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत.
Politics News
Politics NewsAgrowon
Published on
Updated on

Politics Update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात आज (दि.२३) विरोधकांची बैठक बोलावली आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. तसंच अखिलेश यादव, शरद पवार, राहूल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरेही पाटण्यात दाखल झाले आहेत. या सर्व नेत्यांचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात स्वागत केले.

Politics News
Bihar Politics: नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

आजच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीतीबाबत, प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार जागा कशा लढवायच्या? भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार कसा द्यायचा? या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यातील विरोधकांकडून बैठकीवर टीका

आज होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, विरोधकांची आज होणारी बैठक पंक्चर होणार आहे. त्यामुळे या बैठकीला काही अर्थ नाही. तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांनी बैठकीपूर्वी पंतप्रधान उमेदवाराचे नाव जाहीर करावे, असं आव्हानही विरोधकांना दिलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com