Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’च्या बंदिस्त जलवाहिनीला विरोध कायम

Irrigation Scheme : ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या वितरिकांचे रूपांतर बंदिस्त वाहिनीमध्ये करण्याच्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला.
Takari Upsa Irrigation Scheme
Takari Upsa Irrigation Schemeagrowon
Published on
Updated on

Sangli News : ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या वितरिकांचे रूपांतर बंदिस्त वाहिनीमध्ये करण्याच्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. गुरुवारी (ता. २८) येथे आयोजित समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी होते.

ताकारी योजनेच्या मुख्य कालव्यावरील सर्व वितरिका बुजवून बंदिस्त वाहिनीद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन पाटबंधारेकडून प्रस्तावित आहे. मात्र, या कामास वांगीतील शेतकऱ्यांनी विरोध करत काम बंद पाडले आहे. यावर विचारविनिमय होऊन तोडगा काढण्यासंदर्भात बैठक झाली.

Takari Upsa Irrigation Scheme
Irrigation Scheme : सिंचन योजनांची १३२ कोटींची कर्जमाफी

प्रथमतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डवरी यांनी सांगितले, की उघड्या कालव्यातून पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी व लाभक्षेत्रातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली येण्यासाठी या बंदिस्त जलवाहिनीचे काम शासनाने हाती घेतले आहे. यामुळे पाणीपट्टीसुद्धा कमी होणार आहे. पाण्याची बचत होऊन जास्तवेळा पाणी मिळणार आहे.

Takari Upsa Irrigation Scheme
Irrigation Scheme : दुष्काळी भागात फुलणार नंदनवन

यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, बंदिस्त जलवाहिनीमुळे जमिनीत पाणी मुरण्याचे बंद होऊन सर्व जलस्रोत आटणार तसेच विहिरींमध्ये कायमचा खडखडाट होऊन भीषण पाणीटंचाई सदैव जाणवणार आहे. शिवाय परिसरातील जमिनी मुरमाड असल्याने चार दिवसाला पाणी द्यावेच लागते. त्यामुळे सध्या असलेल्या उघड्या वितरिकांतूनच पाणी वितरण करावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

चर्चेत माजी सरपंच डॉ. विजय होनमाने, माजी उपसरपंच बाबासो सूर्यवंशी, अरुण पाटणकर, कृष्णात मोकळे, संतोष मोकळे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ब्रिजराज मोहिते यांनी सहभाग घेतला होता. या वेळी ताकारी योजनेचे सहायक अभियंता दीपक परळे व वसीम मुलाणी, कनिष्ठ अभियंता राहुल थोरात, दीपक सूर्यवंशी, सूर्योदय सूर्यवंशी, सुहास माळी, हरी मोहिते, बंडू बोडरे, अक्षय मोहिते, अमोल मोहिते, दीपक वत्रे, डी. आर. मोहिते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com