Soybean Processing : सोयाबीन प्रक्रियेतील संधी

Processing Industry : कुपोषणावर मात करण्यासाठी सोयाबीन प्रक्रिया पदार्थ फायदेशीर ठरतात.सोया दूध, टोफू, सोया पीठ, सोया प्रोटीन बार, सोया सॉस, सोया पनीर इत्यादी पदार्थ सोयाबीन पासून तयार करता येतात.
Soybean Processing
Soybean ProcessingAgrowon

आशिष तोडकर

कुपोषणावर मात करण्यासाठी सोयाबीन प्रक्रिया पदार्थ फायदेशीर ठरतात.सोया दूध, टोफू, सोया पीठ, सोया प्रोटीन बार, सोया सॉस, सोया पनीर इत्यादी पदार्थ सोयाबीन पासून तयार करता येतात.

सोयाबीनमध्ये ४३ टक्के चांगल्या प्रतीची प्रथिने, २१ टक्के कर्बोदके, ५ टक्के खनिजे, ८ टक्के आर्द्रता, ४ टक्के तंतुमय घटक आणि काही प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. या आरोग्यदायी घटकांमुळे सोयाबीनवर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती करता येते.

सोयाबीन दूध, सोयाबीन पीठ, सोयाबीन पनीर इत्यादी पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी सोयाबीन प्रक्रिया पदार्थ फायदेशीर ठरतात. उत्पादन विकासामध्ये नावीन्यपूर्ण संधी आहेत.

Soybean Processing
Soybean Food Processing : सोयाबीनपासून दूध, टोफू निर्मिती

पीठ ः यामध्ये उच्च प्रथिने, कमी कर्बोदके व ग्लूटेन फ्री आहे. रोजच्या आहारामध्ये गहू पीठ, बाजरी पीठ, इडली-डोसा पिठामध्ये मिसळून प्रथिनांचे प्रमाण वाढवू शकतो. या पिठाला बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. सोयापीठाचा वापर बेकरी, चॉकलेट, स्नॅक्स, सूप निर्मितीमध्ये केला जातो.

चिप्स ः सोया चिप्स बनविण्यासाठी सर्व प्रथम सोया पीठ तयार करणे आवश्यक आहे. सोया चिप्स बनवण्यासाठी सोया पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, चाट मसाला, खाद्य तेल, पाणी हे घटक लागतात.चिप्स निर्मितीसाठी चकली यंत्र, फ्राईंग पॅनची गरज असते.

दूध ः सोयाबीन दूध हे पौष्टिक व ऊर्जावर्धक आहे. यात प्रथिने आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. सोया दुधापासून पेढा, आइस्क्रीम, पनीर निर्मिती करता येते.

Soybean Processing
Food Processing : साताऱ्यात अन्नप्रक्रिया उद्योजकता प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टीक ः हा पौष्टिक कुरकुरीत पदार्थ आहे. सोया पिठामध्ये मसाल्याचे मिश्रण करून सोया स्टीक बनवतात. यामध्ये जास्त प्रथिने असतात. चांगल्या पॅकेजींगमध्ये दोन महिने हा पदार्थ चांगल्या प्रकारे टिकून राहतो. सोया स्टिक तयार करण्यासाठी सोया पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, हळद पावडर, जिरे, धने पावडर, मीठ, बेकिंग सोडा, तेल हे घटक लागतात.

सोयाबीनचे पौष्टिक पदार्थ

पीठ  सॉस

स्टीक  पनीर

प्रोटिन बार  योगर्ट

 दूध  आइस्क्रीम

 चंक्स

- आशिष तोडकर,

९८५०६०७०५१

(अन्न व दुग्ध तंत्रज्ञान विभाग,पारुल विद्यापीठ,वडोदरा,गुजरात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com