Diesel Smuggling : समुद्रात खुलेआम डिझेल तस्‍करी

Mumbai News : जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही सागरी सुरक्षा तकलादू असल्‍याचे डिझेल तस्करीतून समोर येत आहे.
Fuel
Fuel Agrowon
Published on
Updated on

Diesel Rate : अलिबाग, ता. २२ : जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही सागरी सुरक्षा तकलादू असल्‍याचे डिझेल तस्करीतून समोर येत आहे. डिझेल तस्करीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर काही जुजबी कारवाया रायगड पोलिस आणि तटरक्षक दलाकडून केल्या जातात; मात्र पुन्हा जैसे थे तस्‍करी सुरू होते. नुकतेच रेवदंडा बंदरात हजारो गॅलन डिझेल उतरवण्यात आले. हे डिझेल उतरविताना स्थानिक मच्छीमारांनी पाहिले; परंतु कोट्यवधींचा खर्च होत असलेल्‍या सुरक्षा यंत्रणेला हा प्रकार का दिसला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराची तक्रार अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्र सरकारकडे केल्यानंतर केंद्राने राज्य सरकारकडे याप्रकरणी अहवाल मागितला आहे.

मुंबई बंदरात येणाऱ्या मोठमोठ्या जहाजांना भर समुद्रात थांबवून त्यातील डिझेल लुटले जाते. यात जहाजाच्या अधिकाऱ्यांसोबत तस्करांचे संगनमत असते तर काही वेळ बळजबरीही केली जाते. जहाजातून लुटलेले डिझेल स्थानिक मच्छीमार, ट्रकचालक यांना विकून कोट्यवधींचा काळाबाजार सुरू असल्‍याच्या प्रकारावर ‘सकाळ’ने वारंवार आवाज उठवला आहे. आता अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून चौकशीची मागणी केली असून महाराष्ट्रराज्य कोळी महासंघाचे पत्रही त्‍यास जोडले आहे. याची दखल घेत केंद्राने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक बळीराम मोरे यांना पत्र पाठवून चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. डिझेल तस्करीमुळे मच्छीमारांच्या जाळी तुटणे, मच्छीमार बोटींना अडथळा आणणे, मच्छीमारांना मारहाणीची धमकी देणे, असे प्रकार सर्रास होत आहेत. या तस्करांविरुद्ध पोलिस तसेच तटरक्षक दलाकडून नियमित कारवाया होत असल्‍या तरी डिझेल तस्करी थांबलेली नाही.

Fuel
Urea Smuggling : अनुदानित युरियाच्या तस्करीचा संशय

डिझेल तस्करीचा प्रकार खूपच घातक आहे. मच्छीमारांनी कोणतेही बेकायदेशीर काम केल्यास, तत्काळ कारवाई केली जाते; परंतु या डिझेल तस्करांचा अद्याप बंदोबस्त झालेला नाही. डिझेल तस्करीतून कोट्यवधींची उलाढाल होत असताना संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी दाखल झालेले गुन्हे, त्यातील हस्तक यांची सर्व माहिती घेत तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आहे. - संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते डिझेल चोरीचा प्रकार खोल समुद्रात चालतो. पोलिसांना किनारपट्टीपासून पाच किलोमीटर समुद्रात जाऊन ही कारवाई करता येते. सध्या पावसाळ्यामुळे गस्ती नौका बंद आहेत. तीन चार दिवसांत त्‍या सुरू होतील. असा काही प्रकार मागील काही दिवसांत आढळून आलेला नाही. जर रवेदंडा खाडीत असा काही प्रकार असेल तर नक्कीच शोध घेतला जाईल. - सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड

दाखल झालेले गुन्हे डिझेल तस्करांच्या टोळीवर यलो गेट पोलिस ठाणे मुंबई, डिझेल तस्‍करीअंतर्गत मोक्‍का कायद्याद्वारे कारवाई करण्यात आली होती. या टोळीतील आरोपींना मोक्का न्यायालयाने नंतर जामीन मंजूर केला होता. जामीन देताना, रायगड जिल्ह्यात जाऊ नये, डिझेल तस्करी करू नये, अशा अटी त्‍यांना घालण्यात आल्‍या होत्‍या. याच टोळीने पुन्हा रायगड जिल्ह्यातील खाडीलगत असणाऱ्या किनाऱ्यांवर तसेच समुद्रामध्ये डिझेल तस्करीचे धंदा खुलेआम सुरू केला आहे. टोळीवर दादरी सागर पोलिस ठाणे पेणअंतर्गत डिझेल तस्करी गुन्ह्याची नोंद झाली असून त्यांना मुंबईतून अटक झाली होती. त्यानंतर रेवदंडा, तरणखोप पोलिस ठाणे, पेण यांच्या अंतर्गतही तस्‍करीच्या गुन्ह्याची नोंद आहे. सद्यःस्थितीत रायगडमध्येया टोळीवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्ह्याची नोंद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com