OPEC Crude Oil Supply: स्पर्धकाचे कंबरडे मोडण्याची रणनीती

Economic Slowdown : गेले काही महिने खनिज तेलाचे भाव ६० डॉलर प्रति बॅरल आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक मंदीची चाहूल विशेषतः चीन आणि अमेरिका या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये लागत आहे.
OPEC
OPEC Agrowon
Published on
Updated on

Global Crude Oil : खनिज तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना ओपेकने (OPEC) खनिज तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला. कोणत्याही वस्तुमालाचा उत्पादक आपल्या उत्पादित वस्तुमालाचे बाजारातील भाव कसे वाढतील हे बघेल कारण त्यातून त्याला जास्त नफा मिळणार असतो.

पण ‘ओपेक’ला भाव वाढू नयेत असे वाटते म्हणून त्याने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक/ व्यापारी निर्णय कसे होतात याबद्दल आपल्याला एक अंतर्दृष्टी मिळू शकते.

मागणी पुरवठ्याच्या वर आणि खाली जाणाऱ्या रेषा आणि त्या रेषा जेथे परस्परांना छेदतात ती मार्केट प्राइस हा आलेख आपण शाळेपासून शिकत आलो आहोत. हा आलेख जर कोणत्या एका कमोडिटीला बऱ्यापैकी लागू होत असेल तर ते आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खनिज तेलाचे मार्केट.

ओपेक ही मुख्यत्वे मध्यपूर्वेतील तेल उत्पादक राष्ट्रांच्या पुढाकाराखालील संघटना. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे भाव वाढवायचे असतील तर आपापल्या तेल विहिरीतून कमी तेल उत्पादन करणे (म्हणजे पुरवठा कमी करणे) हा खेळ ओपेक संघटना नेहमीच खेळत आली आहे.

गेले काही महिने खनिज तेलाचे भाव ६० डॉलर प्रति बॅरल आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक मंदीची चाहूल विशेषतः चीन आणि अमेरिका या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये लागत आहे. आर्थिक मंदी असेल तर अर्थातच तेलाला मागणी कमी असते. अशा वेळी ओपेक संघटनेने तेलाचे उत्पादन आणि पुरवठा कमी करणे अपेक्षित आहे; जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे भाव अजून खाली जाणार नाहीत. पण निर्णय उलटा झाला आहे.

OPEC
Agriculture And OPEC : ओपेकचा अन्‌ शेतीचा काय संबंध?

याचे एक उद्दिष्ट आहे अमेरिकेतील शेल ऑइल (shale oil) कंपन्यांना जेरीस आणणे. खनिज तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने अमेरिकेने आपल्या देशात शेल ऑइल उद्योगाला बरेच प्रोत्साहन दिले आहे. या उद्योगाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन सातत्याने वाढवले आहे.

आज घडीला अमेरिकेच्या गरजेच्या २० टक्के गरज या शेल कंपन्या भागवू लागल्या आहेत. ओपेक संघटनेला एक नवीन स्पर्धक तयार झाला आहे. करण अमेरिका ओपेक राष्ट्रांचा मोठा आयातदार ग्राहक आहे. शेल कंपन्या अमेरिकेची गरज भागवू लागल्या तर अमेरिका ओपेककडून कमी तेल आयात करणार हे उघड आहे.

आता ६० डॉलर प्रति बॅरल या आकड्याचे महत्त्व जाणून घेऊ.

मध्यपूर्वेतील तेल विहिरी बऱ्याच जुन्या आहेत. त्यांचा भांडवली खर्च कधीच वसूल झाला आहे. अमेरिकेतील शेल कंपन्या नवीन आहेत आणि त्यांची भांडवली गुंतवणूक देखील बरीच आहे. या शेल कंपन्यांना शेल ऑईलचे उत्पादन तेव्हाच किफायतशीर होऊ शकते ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव ६० डॉलर प्रति बॅरलच्या वर असेल. ज्याला ब्रेक इव्हन प्राइस म्हणतात. दुसऱ्या शब्दात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव ६० डॉलर प्रति बॅरलच्या खाली राहिले तर अनेक शेल कंपन्यांना उत्पादन वाढवताना विचार करावा लागेल आणि मुख्य म्हणजे नवीन गुंतवणुकीचा ओघ आटेल.

OPEC
Agriculture OPEC : ‘ओपेक’ समजून घेण्यात शेतकऱ्यांचे हित

आपल्याला कमी नफा मिळाला तरी चालेल पण स्पर्धकांचे कंबरडे मोडले गेले पाहिजे हे यामागील तत्त्वज्ञान आहे. स्पर्धकांचे कंबरडे मोडण्याचे तत्वज्ञान काही नवीन नाही. आपल्या आजूबाजूला घडत आहे. ऑनलाइन, ई कॉमर्स, क्विक कॉमर्स कंपन्या तोटा सहन करून (कॅश बर्निंग) सामान विकतात.

कशासाठी तर परंपरागत असंघटित वाण समान उद्योग / रिटेल उद्योग उखडून काढण्यासाठी. उदा. रिटेल स्टोअर पेप्सीची बॉटल ९० रुपयांना विकत असेल तर क्विक कॉमर्स ८० रुपयांना विकणार. दुकानदार स्वतः ती बॉटल ८५ रुपयांना खरेदी करत असेल तर त्याखाली विकूच शकणार नसतो. कार्पोरेट भांडवलशाहीचे वर्ग चारित्र्य एकदा कळले की अनेक सुट्या गोष्टींचे अन्वयार्थ लागत राहतात. ही प्रणाली आख्या जगावर राज्य करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com