Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

Cashew Crop : राज्य शासनाने जिल्ह्यातील काजू उत्पादकांसाठी प्रतिकिलो १० रुपये अनुदान २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Cashew Seed Subsidy
Cashew Seed SubsidyAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी काजू बी अनुदान मिळण्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात केली असून अर्ज भरण्यासाठी ३० ऑक्टोंबरपर्यत मुदत आहे. परंतु स्वंयघोषणापत्रावरून अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

अजूनही ९० टक्के शेतकरी अर्ज भरायचे असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील काजू उत्पादकांसाठी प्रतिकिलो १० रुपये अनुदान २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Cashew Seed Subsidy
Cashew Orchards : रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादकांना १० वर्षानंतर न्याय; २०१५ मध्ये अवकाळीने नुकसानग्रस्तांना मिळणार व्याजाची रक्कम

या निर्णयातील काही जाचक अटी कमी केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयाची प्रत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदान अर्ज भरण्यास सुरवात केली आहे.

या अर्जामध्ये स्वंयघोषणापत्र १०० रुपयांच्या मुद्रांकावर द्यावयाचे आहे.परंतु १०० रुपयांचा मुद्रांक बंद झाला आहे. सध्या ५०० रुपयांचा मुद्रांक वापरात आहे. त्यामुळे स्वयंघोषणापत्र नेमके कसे द्यायचे याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

Cashew Seed Subsidy
Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

याशिवाय हे अर्ज भरून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत.प्रत्यक्षात तालुकानिहाय या मंडळाची कार्यालये नाहीत. सिंधुदुर्गात कुडाळ येथे एकमेव कार्यालय असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे १०० हुन अधिक किलोमीटरवर जाऊन शेतकऱ्यांना हे अर्ज द्यावे

लागणार आहेत. गेल्या पाच सहा दिवसांपूर्वीच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत हे अर्ज पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रांची पुर्तता करून ३० ऑक्टोंबरपर्यत अर्ज भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांनी अजूनही काजू अनुदान अर्ज भरलेले नाहीत .त्यामुळे आम्ही काजू मंडळाकडे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी करणार आहोत. सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे.
- संजय देसाई, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, दोडामार्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com