Farming Loan : राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचे ४० टक्केच पीककर्ज वितरण

Loan Disbursement : यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील ३३ लाख २८ हजार शेतकऱ्यांना ३३ हजार १७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
Agriculture Loan
Agriculture LoanAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील ३३ लाख २८ हजार शेतकऱ्यांना ३३ हजार १७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पीक कर्जवाटपाचा वेग मंदावला आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे राज्य सरकार, राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या इशाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवत राष्ट्रीयीकृत, खासगी व लघुवित्त बँकांनी शेतकऱ्यांसाठी आपली दारे बंद केली आहेत. या बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्याची सूचना केली आहे.

Agriculture Loan
Loan Repayment : थकहमीवर कर्ज परतफेडीची जबाबदारी संचालकांचीच

यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ३१ जुलैपर्यंत ८८ टक्के कर्जवाटप केले आहे तर राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व लघुवित्त बँकांनी केवळ ४२ टक्के कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये केवळ युको बँकेने ७५ टक्के कर्जवाटप केले आहे, तर खासगी बँकांमध्ये फेडरल व आयडीएफसी बँकेने कर्जवाटपाचा लक्ष्यांक पूर्ण केला आहे. राज्यातील पीक कर्जवाटपाची सरासरी ६० टक्के असून, बुलडाणा (४७ टक्के), जालना (४१ टक्के), परभणी (४१ टक्के), नंदुरबार (४६ टक्के) आणि हिंगोली (४८ टक्के) जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप झाले आहे.

या वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी २४ हजार ६३० कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी १८ हजार ३७५ कोटी रुपयांचा लक्ष्यांक खरिपासाठी होता. यापैकी १७ हजार १३ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकांमधून कर्जास पात्र असलेल्या ४९ हजार ५ शेतकऱ्यांपैकी २२ हजार ३६ शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.

Agriculture Loan
Crop Loan Distribution : खरिपातील पीककर्ज वाटपास गती

तर याउलट राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकांना ४४ हजार १२० कोटी रुपयांचा वार्षिक लक्ष्यांक होता. त्यापैकी खरिपासाठी ३० हजार ७७० कोटी रुपयांचे खरीप हंगामात कर्जवाटप करण्याचा लक्ष्यांक होता. यापैकी केवळ ४२ टक्के म्हणजे १२ हजार ८३७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. शेतकऱ्यांना जेव्हा कर्जाची गरज असते तेव्हा या बँकांनी हात आखडता घेतला असून, १५ जुलै ते ३१ जुलैदरम्यान ३ हजार ५९२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करत लक्ष्यांक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. १५ जुलैअखेर या बँकांनी केवळ ९ हजार २४५ कोटींचे कर्जवाटप केले होते.

सहकार विभागाने राष्ट्रीयीकृत व खासगी, व्यापारी बँकांच्या कर्जवाटपात सुधारणा झाली नसल्याचे नमूद केले आहे. या बँकांनी कर्जवाटपाची गती व व्याप्ती वाढवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

शून्य ते १० टक्क्यांपर्यंत कर्जवाटप करणाऱ्या बँका

इंडियन बँक (४ टक्के), पंजाब अँड सिंध बँक (१ टक्का), युनियन बँक ऑफ इंडिया (४ टक्के), बंधन बँक (शून्य), सीएसबी बँक लिमिटेड (८ टक्के), धनलक्ष्मी बँक (शून्य), कर्नाटका बँक (५ टक्के), केव्हीबी बँक (४ टक्के).

शून्य टक्के कर्जवितरण करणाऱ्या लघुवित्त बँका

एयू स्पॉल फायनान्स बँक

इक्वेटस स्मॉल फायनान्स बँक

इसाफ स्मॉल फायनान्स बँक

जाना स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

पीककर्जाचे वाटप

बँका---कर्जवाटप---कर्जवाटपाचे प्रमाण---कर्जदार शेतकरी

जिल्हा बँका---१७०१३---८८ टक्के---२२.३६ लाख

राष्ट्रीयीकृत बँका---१२८३७---४२ टक्के---७.८६ लाख

खासगी, लघुवित्त बँका, ग्रामीण बँका---३३२९---८६ टक्के---३.१६ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com