Crop Insurance : फक्त ३६ महसूल मंडलांत होते सलग तीन दिवस कमी तापमान

Fruit Crop Insurance : १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत सलग पाच दिवस तापमान ४२ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्यास हेक्टरी ३५ हजार रुपये परतावा केळी विमाधारकांना देय असतो.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून २०२३-२४ या वर्षासाठी केळी विमाधारकांना कमी व अधिक तापमानात केळीच्या नुकसानीसंबंधी परतावे किंवा भरपाई मिळणार असून, यात जळगाव जिल्ह्यातील फक्त ३६ महसूल मंडलांतील हवामानमापक यंत्रात सलग तीन दिवस आठ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे.

तर अधिक तापमानासंबंधी सुमारे ७६ महसूल मंडलांतील केळी विमाधारकांना परतावे मिळणार आहेत. या विमा योजनेतून कमी व अधिक तापमानासंबंधी केळीचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते.

त्यात १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस आठ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास संबंधित महसूल मंडलातील केळी विमाधारकांना हेक्टरी २६ हजार ५०० रुपये परतावा मिळतो. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत सलग पाच दिवस तापमान ४२ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्यास हेक्टरी ३५ हजार रुपये परतावा केळी विमाधारकांना देय असतो. यात जळगाव जिल्ह्यात एकूण ८७ महसूल मंडलांतील सुमारे ५७ हजार केळी उत्पादक २०२३-२४ या वर्षात सहभागी झाले होते.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : जळगाव जिल्ह्यातील फळ पीकविम्याचा प्रश्न सुटेना

यात अधिक तापमानासंबंधी ७६ मंडलांतील केळी विमाधारकांना परतावे मिळणार आहेत. तर कमी तापमान किंवा थंडीत नुकसानीसंबंधी फक्त ३६ महसूल मंडलांतील केळी विमाधारकांना परतावे मिळतील. कमी तापमानासंबंधीच्या नोंदी व्यवस्थित संबंधित हवामाना केंद्रात झाल्या की नाही, त्यात नेटकेपणा व पारदर्शकता आहे का, असा मुद्दा यानिमित्त काही केळी विमाधारक उपस्थित करीत आहेत.

स्कायमेट पुरविते हवामानाच्या नोंदींची माहिती

फळ पीकविमा योजनेत नुकसान भरपाई किंवा परतावे देण्यासंबंधी आवश्यक तापमान, वेगाचा वारा व अन्य माहितीसंबंधी शासकीय वेधशाळा किंवा हवामान केंद्रांकडून कुठलीही माहिती घेतली जात नाही. हवामानाची सर्व माहिती स्कायमेट ही संस्था विमा कंपनी व अन्य शासकीय यंत्रणांना देते. स्कायमेटने जिल्ह्यात हवामानाची माहिती संकलित करण्यासाठी विविध गावे, महसूल मंडलांत हवामानमापक केंद्र (वेदर स्टेशन) उभारले आहेत.

परंतु या वेदर स्टेशनची स्थिती काय व कशी आहे, ते व्यवस्थित कार्यरत असतात का, तेथे पारदर्शकता आहे का, याची माहिती नेटकी घेतली जावी व अधिकाधिक महसूल मंडले कमी तापमानाच्या नुकसान भरपाईसाठी पात्र व्हावीत, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, माजी खासदार आदींनी त्यासाठी पाठपुरावा करावा, असा मुद्दाही उपस्थित होत आहे.

कमी तापमानाच्या भरपाईसाठी पात्र ठरलेले महसूल मंडल - अमळनेर ः अमळनेर, अमळगाव, मारवड, नगाव, पातोंडा. भडगाव ः कजगाव, कोळगाव. चाळीसगाव ः बहाळ, शिरसगाव. धरणगाव ः चांदसर, साळवा, सोनवद. एरंडोल ः उत्राण. जळगाव ः भोकर, म्हसावद. पारोळा ः बहादरपूर, शेळावे. बोदवड ः बोदवड, करंजी. चोपडा ः चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड बुद्रूक. जामनेर ः फत्तेपूर, जामनेर, नेरी बुद्रूक. मुक्ताईनगर ः अंतुर्ली, घोडसगाव, मुक्ताईनगर. रावेर ः खानापूर, खिर्डी बुद्रूक, निंभोरा बुद्रूक, रावेर, सावदा. यावल ः बामणोद, फैजपूर.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : ‘एमआरसॅक’मधील त्रुटींचा केळी विमाधारकांना फटका

अधिक तापमानाच्या भरपाईसाठी पात्र ठरलेले महसूल मंडल ः अमळनेर ः अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे. भडगाव ः भडगाव, कजगाव, कोळगाव. चाळीसगाव ः बहाळ, चाळीसगाव, हातले खडकी, मेहुणबारे, शिरसगाव, तळेगाव. धरणगाव ः धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल ः एरंडोल, कासोदा, उत्राण, रिंगणगाव. जळगाव ः आसोदा, नशिराबाद, पिंप्राळा, भोकर, म्हसावद, जळगाव शहर.

पाचोरा ः गाळण, कुऱ्हाड, नगरदेवळा, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव, वरखेडी. पारोळा ः बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळावे, तामसवाडी. भुसावळ ः भुसावळ, कुऱ्हे, वरणगाव, पिंपळगाव. बोदवड ः बोदवड, नाडगाव. चोपडा ः चोपडा, अडावद, धानोरा, गोरगावले, हातेड, चहार्डी, लासूर. जामनेर ः जामनेर, पहूर, नेरी, शेंदू्र्णी, वाकडी मुक्ताईनगर ः अंतुर्ली, घोडसगाव, कुऱ्हे, मुक्ताईनगर. रावेर ः एे नपूर, खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, सावदा. यावल ः बामणोद, किनगाव बुद्रुक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com