Kukdi Project: कुकडी प्रकल्पामध्ये २७ टक्केच उपयुक्त साठा; उन्हाळ्यात टंचाईची शक्यता

Kukdi Water Stock: कुकडी प्रकल्पात केवळ २७.७०% पाणी शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत १.८२ टीएमसीने घट झाली आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे.
Kukdi Dam
Kukdi DamAgrowon
Published on
Updated on

Narayangaon News: कुकडी प्रकल्पात आजअखेर ८.२२ टीएमसी (२७.७० टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी प्रकल्पात १०.२० टीएमसी (३४.३९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तुलनात्मकदृष्ट्या गतवर्षाच्या तुलनेत प्रकल्पात १.८२ टीएमसी (६.६९ टक्के) कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची सद्यःस्थिती पाहता एप्रिल ते जून दरम्यान प्रकल्प लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत.

तळ गाठल्याने माणिकडोह धरणातून येडगाव धरणात सोडण्यात आलेले पाणी बंद करावे, जुन्नरसाठी पाणी राखून ठेवावे, या मागणीसाठी जय शिवराय शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. गणपत डुंबरे यांनी धरणाच्या भिंतीजवळ गुरुवारी (ता.२०) दुपारी आंदोलन केले. पाणी बंद न केल्यास धरणात उडी मारण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.

Kukdi Dam
Kukdi Irrigation : दहा दिवस आधीच सुटले कुकडीचे आवर्तन

दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे गुरुवारी सायंकाळपासून माणिकडोह धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यात येणार असून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन २५ मार्च २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

कुकडी प्रकल्पाची साठवण क्षमता ३० टीएमसी आहे. सद्यःस्थितीत कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू आहे.येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात १४०० क्युसेकने, डिंभे धरणातून डिंभे डावा कालव्यात ६०० क्युसेकने तर उजव्या कालव्यात २०० क्युसेकने, पिंपळगाव जोगे धरणातून डाव्या कालव्यात २०० क्युसेकने आवर्तन सुरू आहे.

Kukdi Dam
Kukadi Irrigation : कुकडीचे रब्बीसाठी दोन आवर्तन देण्याचा निर्णय: राधाकृष्ण विखे पाटील

मीना शाखा, पूरक व घोड कालव्याचे आवर्तन पूर्ण झाल्याने बंद करण्यात आले आहे. या वर्षी कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात १५ ऑक्टोबर २०२४ अखेर २६.७४५ टीएमसी (९० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कुकडी प्रकल्पातील पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो.

धरणनिहाय गुरुवारचा उपयुक्त साठा

धरण टीएमसी टक्के

येडगाव ०.७४१ ३८.१२

माणिकडोह ०.७२४ ७.१२

वडज ०.५१० ४३.५२

पिंपळगाव जोगे १.०२१ २६.२५

डिंभे ५.२२३ ४१.८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com