Nashik News: नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातंर्गत केवळ १८.२९ टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणीत सहभाग नोंदविला आहे. पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने आता पुढाकार घेत पीक पाहणीस सुरवात केली आहे. त्यासाठी सहाय्यकांची मदत घेण्यात येत असून ८ मार्चपर्यंत संपूर्ण नोंदणीचे उद्दीष्ट प्रशासनाने ठेवले आहे..गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थिती तसेच अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. वारंवारच्या संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पीक विम्याच्या माध्यमातून सरकार मदतीचा हात पुढे करत आहे. या मदतीकरिता पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे..E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी.परंतु जिल्ह्यातील पीक पाहणीची आजची स्थिती बघता बहुतांश शेतकऱ्यांमध्ये नोंदणीत विशेष रस दाखविला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पीक पाहणीसाठीच्या एकूण प्लॉटची संख्या १३ लाख ११ हजार ९४४ इतकी आहे. त्यामधून रब्बी हंगामासाठी आतापर्यंत केवळ २ लाख ३९ हजार ९३२ प्लॉटची नोंदणी झाली असून हे प्रमाण केवळ १८.२९ टक्के इतके आहे..E-Crop Survey: रब्बीची ई- पीक पाहणी नोंदणी चोवीस जानेवारीपूर्वी करावी.दरम्यान, सरकारच्या मार्गदर्शनानुसार २४ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांनी स्वत:हून पीक पाहणीत सहभागी होणे अपेक्षित होते. पण, पीक पाहणीतील संथगती लक्षात घेता दुसऱ्या टप्यांत जिल्हा प्रशासन आणि कृषीतर्फे सहाय्यकांमार्फत नोंदणी सुरु केली आहे. येत्या ८ मार्चपर्यंत ही नोंदणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..जिल्ह्यात ४३ टक्के नोंदणीजिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम मिळून एकूण ४ लाख २४ हजार ९७८ हेक्टर क्षेत्र हे पीक पाहणीअंतर्गत नोंदणी करायचे आहे. पण, मंगळवारपर्यंत (ता.३) जिल्ह्यात १ लाख ८० हजार ८६९ हेक्टरची नोंदणी झाली आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या ८ मार्चच्या मुदतीत सर्व नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. पीक पाहणी नोंदणीसाठी बांधावर येणाऱ्या सहाय्यकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.