Online Satbara Utara
Online Satbara UtaraAgrowon

Online Satbara : ऑनलाइन सात-बारासारख्या सुविधा केवळ एका क्लिकवर

केवळ कीऑस्क मशिनच्या एका क्लिकवर ऑनलाइन स्वरूपात सात-बारा तसेच अन्य सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Published on

Amravati News : शेतकरी तसेच नागरिकांना ऑनलाइन सात-बारा (Online Satbara) तसेच तत्सम सुविधांसाठी आता शासकीय तसेच तलाठी कार्यालयात (Talathi Office) वेळ खर्च करण्याची गरज नाही.

केवळ कीऑस्क मशिनच्या एका क्लिकवर ऑनलाइन स्वरूपात सात-बारा (Land Record) तसेच अन्य सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑनलाइन सात-बारा प्राप्त होणाऱ्या किऑस्क मशिनचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझेले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल मेहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Online Satbara Utara
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी किसान सभेचा ऑनलाईन ट्रेंड

यावेळी श्रीमती कौर म्हणाल्या, ‘‘शेतकरी तसेच नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळावा तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

या माध्यमातून शासकीय कामकाजामध्ये जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शकतेसाठी सात-बारा किऑस्क मशिन मदतनीस ठरणार आहे. यामध्ये साक्षांकित जुने सात-बारा, कोतवाल पुस्तक, गाव नमुना आठ-अ, पेरे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार, जन्म आणि मृत्यू रजिस्टर, कढई पत्रक तसेच ऑनलाइन सात-बारा या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Online Satbara Utara
Land Record : सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ बंधनकारक

या सुविधेंतर्गत शासकीय नोंदणीकक्षातील सर्व कागदपत्रे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन करण्यात आली आहे,’’ असे त्या म्हणाल्या.

किऑस्क मशिन नागरिकांच्या हिताच्या व सोईच्यादृष्टीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com