Online Game : केंद्र सरकारने 'ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५' राज्यसभेत गुरुवारी (ता. २१ ऑगस्ट) मंजूर केले. या वेळी विरोधकांनी घोषणाबाजी आणि गोंधळ घातला असला तरी विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक बुधवारी लोकसभेतही संमत झाले होते..केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर करताना सांगितले , ऑनलाईन गेमिंगचे ई-स्पोर्ट्स, ऑनलाईन सोशल गेम्स आणि ऑनलाईन मनी गेम्स असे तीन भाग आहेत. यातील पहिली दोन क्षेत्रे म्हणजे ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्स यांना प्रोत्साहन देण्यात येईल. तर मनी गेमिंगवर मात्र कठोर निर्बंध या विधेयकाद्वारे घातले जातील." असे ते म्हणाले..Online Gambling Addiction: जीवघेणा विळखा.पुढे वैष्णव म्हणाले, "ई-स्पोर्ट्स हे एक शिस्तबद्ध खेळाचे क्षेत्र आहे. जिथे संघभावना, समन्वय आणि रणनीती शिकवली जाते. अनेक भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. या विधेयकाद्वारे ई-स्पोर्ट्सला कायदेशीर मान्यता मिळणार असून त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले जाईल. सोलिटेअर, बुद्धिबळ, सुडोकू यांसारख्या सोशल गेम्सना देखील प्रोत्साहन देण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे." अशी माहिती त्यांनी दिली..मंत्री वैष्णव यांनी ऑनलाईन मनी गेमिंगला 'सार्वजनिक आरोग्याचा धोका' ठरवत सांगितले की, ऑनलाईन गेमिंगमुळे समाजात विशेषतः मध्यमवर्गीय तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात. ४५ कोटी लोक या गेम्सचा बळी ठरले असून २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम यामध्ये बुडाली आहे. .Online Money Games Bill : केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर.तसेच जागतिक आरोग्य संघटनेने याला गेमिंग डीसऑर्डर म्हणून घोषित केले आहे. मनी गेम्समुळे मानसिक विकार, हिंसक वर्तन, जबरदस्तीचे वागणे यांसारखे दुष्परिणाम दिसून येत आहेत.तसेच मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांशी जोडलेला आहे," असेही त्यांनी अधोरेखित केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.