Onion Rate : कांद्याचा वांदा केल्याने पंतप्रधान मोदींना जाब विचारणार

Narendra Modi : २०१४, २०१९ व आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे येत आहेत.
Onion Export
Onion ExportAgrowon

Nashik News : २०१४, २०१९ व आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कांदा उत्पादकांचा रोष असताना त्यात शिवसैनिकांची भर पडली आहे.

पंतप्रधानांनी आजवर शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली, मात्र आश्‍वासनपूर्ती झालेली नाही, त्यामुळे पंतप्रधानांना जाब विचारायला या असे आवाहन निफाड तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसैनिकांना करण्यात आले आहे. मात्र पोलिस बंदोबस्त कडक असल्याने शिवसैनिकांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Onion Export
Onion Market : ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची घोषणा नावापुरतीच

‘‘पंतप्रधानांनी कांदाप्रश्‍नी आश्‍वासन देऊनही कुठलेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. अस्थिर धोरणे व निर्णयांमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कालपर्यंत आपल्याला प्रश्‍न विचारले जात होते, त्याला आपण जयघोषात उत्तर द्यायचो.

आता त्यांना जयघोषात प्रश्‍न विचारू तरच ते शेतकऱ्यांना व त्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देतील, ही अपेक्षा ठेवून पिंपळगाव बसवंत येथे सभेला जाऊ आणि जाब विचारू,’’ अशी भूमिका निफाड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

Onion Export
Onion Rate : सोलापुरात कांद्याला मातीमोल भाव; २४ पोते कांद्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या हातात आले फक्त ५५७ रूपये

‘शेतीचे उत्पन्न दुप्पट करून त्याला योग्य भाव देऊ,’ अशी घोषणा मोदी यांनी केली होती. दहा वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, योग्य हमीभाव मिळाला का, कांदा निर्यातबंदी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय हित साधले, निवडणुकीच्या तोंडावर ५५० डॉलर कांद्यावर निर्यातशुल्क आकारून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ का चोळले, महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प जाहीर करून किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण केले, देशात शेतकरी आत्महत्या कदापि होऊ देणार नाही, असे आपण जाहीर केले होते. मग तरीही शेतकऱ्यांना का आत्महत्या करावी लागते आहे, असे प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

शेतकरी, मजूर, व्यापारी यांच्या स्वप्नांची होळी झाली

पिंपळगावात शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्याच ठिकाणी आपण कांदा लिलाव करतो. त्याच कांद्याचा वांदा करणाऱ्या मोदींनी शेतकऱ्यांची काय परिस्थिती केली आहे. शेतकरी, मजूर, व्यापारी यांच्या स्वप्नांची कशी होळी झाली यांचे उत्तर घेतलेच पाहिजे. आजवर अनेक घोषणा त्यांनी केल्या. त्याचे स्मरण मोदी यांना करून देण्यासाठी सभेसाठी येऊन जाब विचारू, असे आवाहन नीलेश पाटील, सुधीर कराड, विक्रम रंधवे, आशिष शिंदे, खंडू बोडके-पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com