Onion Market : कांदा उत्पादकांचा ‘नाफेड’वर धडक मोर्चा

NAFED : येत्या आठ दिवसांत कांदा खरेदीत पारदर्शकता आणत कांद्याला चाळीस रुपये किलो भाव न मिळाल्यास ‘नाफेड’चे कार्यालय कांद्याने भरून टाकण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
Onion Market : कांदा उत्पादकांचा ‘नाफेड’वर धडक मोर्चा
Published on
Updated on

Nashik News : ‘कांद्याला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे’, ‘कांदा निर्यातबंदीचा निषेध असो’, ‘नाफेड हाय-हाय’ अशा घोषणा देत शुक्रवारी (ता. २२) कांदा उत्पादकांनी ‘नाफेड’च्या येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला, ‘नाफेड’च्या व्यवस्थापकांना घेराव घालत संताप व्यक्त करण्यात आला. या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना व्यवस्थापक निखिल पाडदे यांची दमछाक झाली.

दरम्यान, येत्या आठ दिवसांत कांदा खरेदीत पारदर्शकता आणत कांद्याला चाळीस रुपये किलो भाव न मिळाल्यास ‘नाफेड’चे कार्यालय कांद्याने भरून टाकण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Onion Market : कांदा उत्पादकांचा ‘नाफेड’वर धडक मोर्चा
Onion Rate : कांदा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी

निर्यातबंदी नंतर कोसळलेले बाजारभाव व ‘नाफेड’कडून कांदा खरेदीत होणारी घोटाळा अशी तक्रार करीत विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेचे हरसिंग ठोके, गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा ‘नाफेड’ कार्यालयावर काढला, ‘नाफेड’चे कांदा खरेदी केंद्र तपशील दडवून ठेवल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी थेट कांद्याचा ट्रॅक्टर ‘नाफेड’ कार्यालयाच्या आवारात आणला, यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Onion Market : कांदा उत्पादकांचा ‘नाफेड’वर धडक मोर्चा
Onion Rate : दराअभावी शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने बाजार समितीतून कांदा खरेदी करावा, क्विंटलला चार हजार रुपये भाव द्यावा, कांदा निर्यात खुली करावी, खरेदी केंद्राच्या माहितीचा तपशील द्यावा, दोन वर्षांतील कांदा खरेदीचा तपशील जाहीर करून खरेदीतील तफावतीची सरकारी चौकशी व्हावी, कांदा अनुदान तत्काळ देण्यात यावे,अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या, तसेच कंपन्यांकडून होणाऱ्या कांदा खरेदीच्या भ्रष्टाचाराला ‘नाफेड’चे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

या वेळी गणेश निंबाळकर, गणेश तिडके, संजय देवरे, संदीप जाधव, आकाश थोरात, रवींद्र जगताप, शुभम अहिरराव, नंदू जगताप, सुरेश कारे, मोहन जाधव, राजेंद्र शिंदे, सोपान ठोके, संदीप ठोके, नीलेश गुंजाळ, रेवन गांगुर्डे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अशोक पवार, प्रभाकर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com