Farmer Protest Maharashtra : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांद्याला हमीभाव देण्यासह विविध मागण्यांसाठी पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथे मंगळवारी (ता.२) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा ओतून रास्ता रोको आंदोलन केलं आहे. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सहभागी झाले. .राज्यातील कांदा उत्पादकांचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शेकडो शेतकऱ्यांनी सकाळीच पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन सुरु केले..Onion Export Policy: कांदा दर, निर्यातीबाबत शाश्वत धोरण ठरवावे : मंत्री छगन भुजबळ .या आंदोलनाला पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारलं. यावेळी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे मंचर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली..संघर्ष सुरु राहणारशेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत राहू, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली आहे. कांदा उत्पादकांचा रास्ता रोको मोडून काढण्यासाठी नेत्यांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी सपकाळ म्हणाले, "हे जुलमी सरकार उलथून टाकण्यासाठी संघर्ष करत राहू. पोलिस आम्हाल ताब्यात घेऊन दडपशाही करत आहेत. परंतु आम्ही संघर्ष करत राहणार आहोत, असे सपकाळ म्हणाले..आमदार शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, आम्हाला अटक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे सरकार रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कांदा प्रश्नावर महाराष्ट्राचा चक्काजाम महाविकास आघाडी करणार, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे..आमदार अतुल बेनकेंचा घरचा आहेरकांदा उत्पादकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार अतुल बेनके यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. बेनके यांनी कांदा उत्पादकांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. "आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात सहभागी झालो आहोत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, पोलिस त्यांचं काम करत आहेत. कांदा उत्पादकांन मदत व्हावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे." असेही बेनके म्हणाले..प्रमुख मागण्या काय?कांद्याला प्रतिक्विंटल २५०० रुपये हमीभाव.आधीच्या कांद्याला १५ ते २० रुपये अनुदान द्या.नाफेडकडून कांदा खरेदी करावी.केंद्र सरकारने १० लाख टन कांदा खरेदी करावा.आंध्र प्रदेश प्रमाणे मदत द्या.निर्यात धोरणात सुधारणा करा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.