Onion Export Ban : नगर जिल्ह्यांत कांदा उत्पादकांमध्ये रोष

Onion Farmer Issue : मागील दोन लिलावात पडले. आधीच संकटातून कांदा पीक जगवले मात्र निर्यातबंदीमुळे बाजारात दर पडले असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon

Nagar News : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे कांद्याचे दरमागील दोन लिलावात पडले. आधीच संकटातून कांदा पीक जगवले मात्र निर्यातबंदीमुळे बाजारात दर पडले असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.

रविवारी (ता.१०) पारनेरला कांदा लिलाव बंद पाडले, तर सोमवारी (ता.११) नगर व बीड जिल्ह्यांतील काही कार्यकर्त्यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे धरणे आंदोलन, लाक्षणिक उपोषण केले.

Farmer Issue
Onion Farmer : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं ; रोहित पवारांचा मोदी सरकारवर हल्ला

दरम्यान, निर्यातबंदीमुळे कांदा दरात घसरण झाली आहे. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी मिळून सुमारे दोन लाख हेक्टरच्या जवळपास कांदा लागवड होत असते.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कांदा लागवड क्षेत्र घटणार असले तरी बहुतांश भागात यंदाही कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. एकतर उन्हाळ्यातील कांद्याला गारपीट, पावसाने मोठा फटका बसला, त्यातही मागील काळात कांद्याला दर मिळत नसल्याने मोठे नुकसान झाले.

Farmer Issue
Onion Export Ban : सोलापूर बाजार समितीत सोमवारी १४०० कांदा गाड्यांची आवक

मातीमोल दराने कांदा विकावा लागला. महिनाभरापासून कांद्याला बऱ्यापैकी दर मिळू लागला असताना दर पाडण्यासाठी कांदा निर्यात बंदी केल्याचा आरोप करत संगमनेर येथे आंदोलन करत लिलाव बंद पाडले. रविवारी (ता.१०) पारनेरला लिलाव बंद पाडले.

सोमवारी (ता.११) नगरच्या दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव होत असलेल्या नेप्ती उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते बच्चू मोढवे, आजमुद्दीन शेख, बच्चू मोडवे, संतोष गुड, परमेश्वर घोडके, बाळासाहेब गुंड, सुधीर भद्रे, प्रा. डॉ. राम बोडखे, राजेंद्र कर्डिले, स्वप्नील पोटे, धुळाजी लकडे, विलास खटके, दादासाहेब विधाते, गणेश विष्णू पवार, गौतम आजबे, विशाल साठे यांच्यासह नगर व बीडमधील कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी मागण्याचे जिल्हाधिकांऱ्यांना निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com