Onion Cultivation In Parbhani : परभणी जिल्ह्यात ७९७ हेक्टरवर कांदा लागवड

परभणी जिल्ह्यातील २०२२-२३ या वर्षी चे कांदा, टोमॅटो, बटाटा या पिकांचे लागवड क्षेत्र कृषी विभागाकडून अंतिम करण्यात आले.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २०२२-२३ या वर्षी चे कांदा (Onion), टोमॅटो (Tomato), बटाटा (Potato) या पिकांचे लागवड क्षेत्र कृषी विभागाकडून (Agriculture Department) अंतिम करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात यंदा कांदा ७९७.८ हेक्टरवर, टोमॅटो ४९७.३ हेक्टरवर, बटाटा ३० हेक्टरवर लागवड झाली आहे.

या तीन पिकांचे मिळून एकुण १ हजार ३०७ हेक्टर लागवड झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवड क्षेत्रात २४७ हेक्टरने वाढ झाली.

टोमॅटोच्या क्षेत्रात ३१८ हेक्टरने तर बटाट्याच्या क्षेत्रात ४ हेक्टरने वाढ झाली आहे. या तीन बागायती पिकांची मिळून ५८९ हेक्टरने वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु सिंचन प्रकल्पाच्या कालव्याव्दारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा सिंचनासाठी पाणी मिळाले. गेल्या काही वर्षात सिंचन विहिरी, विंधन विहिरींची संख्या वाढली आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : मका, कांद्याचे पीक बहरले

अनेक शेतकऱ्यांनी अस्तरीकरण शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित पाणीसाठा उपलब्ध केला आहे. पिकांच्या सिंचनासाठी विविध स्रोत उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी नगदी बागायती पिकांकडे वळले आहेत.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील दररोजचे उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटो या पारंपारिक पीकांसोबत गेल्या दोन चार वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेत आहेत.

जिल्ह्यात शेतकरी खरीप, उशिरा खरीप आणि रब्बी हंगामात कांदा लागवड करतात. गतवर्षी (२०२१-२२) मध्ये परभणी जिल्ह्यात कांदा ५५०.८ हेक्टरवर, टोमॅटो १६१.३ हेक्टरवर, बटाटा २६ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा या तीन बागायती पिकांच्या क्षेत्रात ५८९ हेक्टरने वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय कांदा,टोमॅटो,बटाटा लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका- कांदा- टोमॅटो- बटाटा

परभणी - १५०- ९४- ७

जिंतूर - १५५ - ९६ - १२

सेलू - १४९.८- ५३.३- १

मानवत- ६५- ८०- ३

पाथरी - ४३- २७- ५

सोनपेठ- १४ - ७- ००

गंगाखेड- ११२- ४६ - ००

पालम - २२ -- २६ - २

पूर्णा - ८७ - ५० - ००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com