डॉ. हृषिकेश गुर्जरआंबा खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या कोयींपासून तेलनिर्मिती आणि मँगो बटर तयार करण्याचे संशोधन पूर्ण झाले आहे. आंब्याच्या कोयींपासून तयार केलेले तेल आणि मँगो बटर अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबी स्रोत; तर कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या संशोधनामुळे फेकून देण्यात येणाऱ्या कोयींच्या पुनर्वापरातून शाश्वत उत्पादन, स्थानिक उद्योगांची वाढ आणि पोषकमूल्य वाढवण्याची नवी संधी तयार होत आहे..मँगो बटर निर्मितीहापूस आंब्याच्या कोयींचा नवीन कलमे निर्मितीशिवाय अन्य ठिकाणी पुनर्वापर केला जात नाही, हे लक्षात घेऊन या वाया जाणाऱ्या कोयींवर संशोधन करण्यात आहे. या संशोधनामध्ये कोयींच्या तेलाचे निष्कर्षण करून गुणधर्म तपासले. त्यानंतर नानकटाई, कुकीजमध्ये वनस्पती तुपाऐवजी या तेलाचा वापर करण्यात आला. आंबा कोयींपासून मिळणारे तेल शुद्धीकरण केल्यानंतर ते मँगो बटर या स्वरूपात रूपांतरित केले जाते. हे बटर कॉस्मेटिक उद्योगात विशेषतः त्वचा मृदुकारक, लिप बाम, लोशन, हेअर क्रीम आणि सोप उत्पादनात वापरणे शक्य आहे..Hapus Mango Rate : देवगड हापूसला मिळाली थेट अमरावती बाजारपेठ.मँगो बटरमध्ये ओलेइक अॅसिड आणि स्टिअरिक अॅसिड मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित, पोषणदायी आणि हायपोअॅलर्जेनिक मानले जाते. बटर खाद्य स्वरूपातही ते पूर्णतः सुरक्षित असून, वनस्पती तुपाचा उत्कृष्ट पर्याय म्हणून कुकीज, बेकरी पदार्थ, चॉकलेट, मिठाई आणि स्नॅक्स उत्पादनात वापरण्यास उपयुक्त आहे. कोयींचे तेल आणि त्यापासून तयार होणारे मँगो बटर हे दोन्ही अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबीस्रोत आणि कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरत आहे..Hapus Mango Production: हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच.तेलनिर्मितीआंबा कोयींपासून तेलनिर्मितीसाठी विभक्त प्रक्रिया (सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन) आणि प्रचंड दाबाचा (कोल्ड प्रेस) वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत कण आकार (१-५ मिमी), द्रावक प्रकार (एन-हेक्साने आणि पेट्रोलियम इथर) आणि निष्कर्षण वेळ (९० मिनिटे) हे घटक विचारात घेण्यात आले..प्रक्रियेअंती विभक्त प्रक्रिया पद्धतीमध्ये सर्वाधिक तेल उत्पन्न १०.९० टक्के मिळाले, तेही ५० अंश सेल्सिअस तापमानावर, एन-हेक्साने द्रावक वापरून आणि ९० मिनिटांच्या कालावधीत त्यानंतर ६० अंश आणि ७० अंश सेल्सिअस तापमानांवर अनुक्रमे १०.६० टक्के आणि १०.५५ टक्के तेल मिळाले, तर कोल्ड प्रेस पद्धतीने फक्त ५ टक्के तेल उत्पादन दिसून आले.- डॉ. हृषिकेश गुर्जर ८८८८३७२४४५ (लेखक प्रक्रिया तंत्र अभ्यासक आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.