Akola Fertilizer Warehouse Raid : धाडीतील अधिकाऱ्यांना पुण्यात येण्याचे फर्मान

Fertilizer Warehouse Checking : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गाजत असलेल्या अकोला येथील कृषी निविष्ठा साठवणूक गोदाम तपासणी प्रकरणी आज (ता.१७) तातडीने कृषी आयुक्तालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Fertilizer Warehouse Dhad
Fertilizer Warehouse DhadAgrowon
Published on
Updated on

Akola News : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गाजत असलेल्या अकोला येथील कृषी निविष्ठा साठवणूक गोदाम तपासणी प्रकरणी आज (ता.१७) तातडीने कृषी आयुक्तालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या धाड सत्रात सहभागी कृषी खात्यातील संबंधित सर्व तंत्र अधिकाऱ्यांना अहवाल व कागदपत्रांसह हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Fertilizer Warehouse Dhad
Marriage Fraud : बनावट नवरीसह सहा जणांच्या टोळीला अटक

अकोल्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या विविध कंपन्यांच्या गोदामांची ७ ते ९ जून या काळात धडक तपासणी करण्यात आली.

या प्रकरणातील गोंधळ व सरकारवर होत असलेली टीका पाहता मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना विचारणा केल्याचेही समोर आले. दुसरीकडे अकोल्यातील साठवणुकदार आता या खासगी व्यक्तींविरुद्ध पोलिस कारवाईसाठी एकवटले आहेत. अशातच या तपासणीत सहभागी सर्व अधिकाऱ्यांना तातडीने कृषी आयुक्तालयात बोलविण्यात आले आहे.

कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक होत आहे. या बैठकीस अकोला येथील स्थानिक निरीक्षकांसह सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे. बैठकीत अनुपस्थित राहण्यासंदर्भातील कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असे या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com