Odisha Farmers Protest Over Paddy Procurement: धान खरेदी व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नवनिर्माण कृषक संघटनेने (NKSS) ओडिशात आठ तासांचा राज्यव्यापी बंद पाळला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुरी- भुवनेश्वर रस्त्यावर टायर पेटवून मार्ग रोखून धरला. यामुळे वाहतूक ठप्प झाली. .राज्य सरकारच्या बाजार समित्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ८०० रुपये थेट निविष्ठा अनुदान मिळावे आणि धान खरेदी प्रक्रियेतून मध्यस्थ आणि गिरणी मालकांना हटवावे आदी प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. स्मार्ट वीज मीटर बसवणे तसेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रांच्या (पीयूसीसी) नावाखाली वाहन मालकांवर लादलेला मोठा दंड आणि 'मनरेगा'ऐवजी नवीन रोजगार हमी योजना आणण्याच्या निर्णयालाही संघटनेने जोरदार विरोध केला आहे. .राज्यातील अनेक भागात बस सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तर व्यवसायिक आस्थापने सुरु होती. जोपर्यंत त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. कारण हा बंद शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या लढाईचा एक भाग आहे, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. .Punjab Farmers Protest: वीज, बियाणे विधेयक मागे घ्या, पंजाबमधील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च.भुवनेश्वर आणि इतर अनेक भागात सकाळी ६ वाजल्यापासून 'एनएनकेएस'च्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरली. काही ठिकाणी टायर पेटवून निदर्शने करण्यात आली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. .Farmers and Workers Protest: बारा फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक.ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीने या बंदला पाठिंबा दर्शवला. तर, सत्ताधारी भाजपने (BJP) हा बंदला विरोध केला. त्यांनी हे बनावट शेतकरी आंदोलन असल्याचा आरोप केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.