Ahilyanagar News: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे आता आतापर्यंतचा विचार केला तर चौथ्यांदा महिलेला महापौर पदाची संधी मिळणार आहे. सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादीला २७, तर भाजपला २५ जागा मिळाल्या. त्यामुळे महापौर पदावर कोणाला संधी मिळेतेय याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. सहा महिला नगरसेवक महापौर पदासाठी दावेदार आहेत..यापूर्वी निवडणुकीपूर्वीच महापौर पदाचे आरक्षण जाहीर होत असे. त्यामुळे महापौरपदाचे उमेदवार अधिक ताकद वापरून निवडून येत होते. या वेळी मात्र आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात आले. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन व भाजपचे दोन, असे पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २७ तर भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले. स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे) केवळ १० जागा मिळाल्या..Mumbai Mayor Election: मुंबई महापौरपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधवांची एकनाथ शिंदे यांना साद.काँग्रेस २, एमआयएम २, शिवसेना (ठाकरे गट) १, बसप १ जागा मिळालेली आहे. महापौरपदासाठीचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून नगरसेवक संपत बारस्कर, गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे तर भाजपकडून निखिल वारे, धनंजय जाधव, बाबा वाकळे यांची संधी आरक्षणामुळे पहिले अडीच वर्ष तरी गेली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून वर्षा काकडे, सुजाता पडोळे, अश्विनी लोंढे, ज्योती गाडे, आशा डागवाले, सुनिता फुलसौदर तर भाजपकडून शारदा ढवण, पुष्पा बोरुडे व आशाबाई कातोरे या महिला महापौर पदासाठी दावेदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे..Akola Municipal Mayor Reservation: अकोला महापालिकेत महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण.अजून ठरलेले नाही...अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भाजप एकत्र लढले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला २७ तर भाजपला २५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दोन जागा अधिक असल्या तरी महायुती म्हणून लढताना महापौर पदाचे ठरलेले, नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे अद्यात निश्चित नसले तरी भाजपच्या नगरसेविकांनी थेट मुंबईपर्यंत फिल्डिंग लावल्याचे समजते. ‘आपलाच हक्क’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून श्री. जगताप यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे..अहिल्यानगरचे आतापर्यंतचे महापौरभगवान फुलसौंदर (नागरिकांचा मागास प्रवर्ग)संदीप कोतकर (खुला वर्ग)संग्राम जगताप (नागरिकांचा मागास प्रवर्ग)शीला शिंदे (महिला राखीव)संग्राम जगताप (खुला प्रवर्ग)अभिषेक कळमकर (खुला प्रवर्ग)सुरेखा कदम (महिला राखीव)बाबासाहेब वाकळे (खुला प्रवर्ग)रोहिणी शेंडगे (महिला अनुसूचित जाती).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.