QRCode Complaint: आता क्यूआर कोडद्वारे तक्रार-सूचना नोंदवा

Digital Governance: आपल्यावर होणारा अन्याय, कामकाजातील दिरंगाई यासाठी नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
QRCode Complaint
QRCode ComplaintAgrowo
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: आपल्यावर होणारा अन्याय, कामकाजातील दिरंगाई यासाठी नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.फक्त क्युआर कोड आपल्या मोबाइलमध्ये स्कॅन करा आणि आपली तक्रार वा सूचना नोंदवा, अशी ही अभिनव संकल्पना असून मंगळवारपासून (ता. ३) प्रत्येक तहसील व उपविभागीय कार्यालयांमध्ये हे क्युआर कोड प्रदर्शित करण्यात आले आहेत.

QRCode Complaint
Pune Revenue Complaints: ‘महसूल’ तक्रारी सोडवण्यात पुणे शेवटून तिसरे

नागरिकांना तक्रार व सूचना नोंदविताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयांमध्ये तक्रार पेटीशेजारी क्युआर कोड लावण्यात आले आहेत. या कोडच्या माध्यमातून नागरिक आता आपली तक्रार किंवा सूचना डिजिटल पद्धतीने थेट नोंदवू शकतील. जिल्ह्यात सध्या १६ ठिकाणी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत.

QRCode Complaint
Expressway Land Acquisition : उपविभागीय कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी निलंबित द्रुतगती महामार्ग भूसंपादन, फळझाडांचे मूल्यांकन प्रकरण

या उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार अर्ज देण्याचा त्रास टळेल. प्रवास खर्च वाचेल, तसेच ज्यांना डिजिटल प्रणालीचा वापर शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच तक्रार किंवा सूचना लिहून पेटीत टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा उपक्रम पारदर्शक, तत्पर आणि उत्तरदायी प्रशासनाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

क्युआर कोड स्कॅन केल्यावर नागरिकांनी आपली प्राथमिक माहिती (नाव, फोन नंबर इ.) भरून आपली तक्रार वा सूचना टाइप करून नोंदवावी. ही तक्रार अपलोड केल्यावर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात प्राप्त होईल. ती तक्रार तत्काळ संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल व तक्रारी, सूचनांच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा व आढावा घेण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com