Union Co-Operative Ministry : ‘ज्ञानेश्वर’च्या विकास कामांची केंद्रीय सहकार खात्याकडून नोंद

Co-Operative Sugar Mill : ज्ञानेश्वर साखरे साखर कारखान्याने प्रगती करत १२५० टनांवरून प्रतिदिन ९००० टन ऊस गाळप क्षमता वाढ, केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत सहवीज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले.
Co-Operative Sugar Mill
Co-Operative Sugar MillAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाला सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे (एनसीडीसी) व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार बंसल यांची ज्ञानेश्वर उद्योग समूहाला भेट देऊन सहकाराच्या माध्यमातून झालेल्या सामाजिक-आर्थिक विकासाची नोंद घेतली.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अधीन असलेल्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) मार्फत सहकार क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देणे, सहकाराचे फायदे तळागाळात पोहोचविणे, कृषी उत्पादनाकरिता वित्तपुरवठा करणे हे या ‘एनसीडीसी’चे मुख्य उद्देश आहेत. अशा या एनसीडीसीचे कार्यकारी संचालक बंसल यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. एनसीडीसीचे पुणे विभागीय संचालक कर्नल विनीत नारायण हे त्यांच्या सोबत होते.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. बंसल यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ५० वर्षांपासून सहकार क्षेत्रात चांगले काम करीत आहे. त्या माध्यमातून परिसरात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तर कसा उंचावला याची पाहणी केली.

Co-Operative Sugar Mill
Vasant Co-operative Sugar Factory : ‘वसंत’च्या गैरव्यवहाराची स्थगित चौकशी पुन्हा सुरु

ज्ञानेश्वर साखरे साखर कारखान्याने प्रगती करत १२५० टनांवरून प्रतिदिन ९००० टन ऊस गाळप क्षमता वाढ, केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत सहवीज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले. शेतकऱ्यांना वैयक्तिक उपसा सिंचन योजनेकरिता पाणी परवाने मिळवून देऊन पाइपलाइन करिता बँक कर्ज उपलब्ध करून दिले.

Co-Operative Sugar Mill
Co-operative sugar factories Income Tax : सहकारी साखर कारखान्यांचा अडकलेला प्राप्तिकर व्याजासह मिळणार

त्यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. शेती आणि रोजगार याच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक जीवनमान उंचावले. कामगारांना हक्काचे घर देणारी गृहनिर्माण संस्था, महिला संस्था निर्माण केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी विद्यालय, नर्सिंग कोर्सेस सुरू केले.

या सर्व सामाजिक-आर्थिक विकासाची नोंद घेतली. साखर निर्मिती, सी-हेवी व बी-हेव्ही मोलासेस, सहवीज प्रकल्प, इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इहॅपोरेशन प्रकल्प, इंसनरेशन बॉयलर आदी प्रकल्पांची पाहणी केली. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी त्यांना माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com