दर्जेदार, डागमुक्त फळांसाठी फ्रूट कव्हरडाळिंब, पेरू आणि आंबा यांसारख्या फळांना बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी फळ दिसायला सुंदर आणि डागमुक्त असणे गरजेचे असते. यासाठी नॉन-वोव्हन फ्रूट कव्हरचा वापर करावा..फायदेफळांवर होणारा फळमाशाची प्रादुर्भाव यामुळे थांबतो.जेव्हा फळ टेबल टेनिस बॉलच्या आकाराचे होते तेव्हा कव्हर लावल्यामुळे त्यावर सूर्याची अतिनील किरणे थेट पडत नाहीत, ज्यामुळे फळाचा नैसर्गिक आणि उठावदार रंग विकसित होतो..Fruit Protection Bag : फळांच्या प्रोटेक्शन बॅगसाठी अनुदान देणार.फळ कव्हरच्या आत सुरक्षित असल्याने बाहेरील फवारण्यांचा खर्च वाचतो आणि फळे रसायन अवशेषमुक्त तयार होतात.अति उष्णता, थंडी किंवा अवकाळी पावसामुळे फळावर पडणारे डाग टाळता येतात..फॅब्रिक कव्हरबागेतील वातावरणात स्थिरता आणण्यासाठी फॅब्रिक कव्हरचा वापर केला जातो. विशेषतः डाळिंब आणि द्राक्ष बागेत याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत..फायदेहे झाडाभोवती एक सुरक्षित कवच तयार करते, ज्यामुळे ''मिनी ग्रीन हाउस इफेक्ट मिळतो.फुलकिडे, पांढरी माशी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.झाडाची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे झाड हिरवेगार राहते आणि फळांची सेटिंग चांगली होते.बाहेरील वातावरणाशी थेट संपर्क तुटल्यामुळे कीडनाशकांच्या फवारण्यांचे प्रमाण ४० ते ५० टकक्यांनी कमी होते..फळे, भाजीपाला बांधणी / वळण देण्याची वायरद्राक्ष, डाळिंबाच्या आधार प्रणालीसाठी हाय टेन्शन पॉलिमर वायर वापरली आहे.फायदेलोखंडी वायरसारखी ही वायर गंजत नाही, त्यामुळे १० वर्षांहून अधिक काळ टिकते.कडक उन्हातही ही वायर गरम होत नाही. जीआय वायर गरम झाल्यामुळे झाडाच्या फांद्या पोळतात, तसा धोका येथे राहत नाही.वायर वजनाला हलकी आणि लावण्यासाठी सोपी आहे. दहा वर्षे देखभालीची गरज पडत नाही, खर्चात बचत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.